Home जागर डॉक्टर दाम्पत्य देत आहे औषधीसोबतच हा लाखमोलाचा ‘डोज’

डॉक्टर दाम्पत्य देत आहे औषधीसोबतच हा लाखमोलाचा ‘डोज’

स्टोरी : जमीर शाह 

बुलडाणा : कोरोना प्रादुर्भाव पाहता प्रत्येकजण हवालदिल झालेला आहे अश्यातच ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्याने दगवणारे रुग्ण तर काही ठिकाणी ऑक्सिज युक्त बेड नसल्या कारणाने मारणारे रुग्ण याने सोशल मीडिया,इलेक्ट्रनिक मीडिया,वृत्तपत्रे भरलेली आहे अशीच परिस्थिती जर वातावरणातील ऑक्सिजन कमी झाल्यावर झालीतर काय होईल यावर एक तोडगा म्हणून नगर जिल्ह्यातील एक डॉक्टर दाम्पत्य आपल्या जवळ उपचारा साठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णास झाडे लावण्याचे संदेश देत आहे ज्याने त्यांची ही औषधी लिहिलेली चिट्ठी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हीच ती चिट्ठी

झाडे लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही, डॉक्टर देतोय प्रत्येक रुग्णाला हा संदेश.
कोरोना प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाला ऑक्सिजन (प्राणवायू) बद्दल आपुलकी वाटायला लागली मात्र हा प्राणवायू मुबलक प्रमानात निसर्गात निर्मित्ती होऊ शकते त्या साठी झाडे लावायला हवी हा संदेश नगर येथील डॉक्टर आपल्या औषधीच्या चिट्ठीवर लिहून देतोय.

कोरोना ग्रस्त रुग्णास कोणत्याही दवाखान्यात नेल्यावर सोबत असणाऱ्यांचा एकच प्रश्न असतो ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा आहे का अश्यात कोरोनाने प्रत्येकाला ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूची ओळख करून दिली आणि याच ऑक्सिजनवर दिवसभर टीव्हीवर बातम्या सुरू असल्याने ऑक्सिजन साठी प्रत्येजन चिंतीत दिसून येतो मात्र दुसरीकडे हा प्राणवायू निसर्गात तयार होणे थांबले तर प्रत्येका साठी प्राणवायू आणायचा कोठून प्राणवायू तयार होणारे कारखाने म्हणजे जंगल त्याची आपण कत्तल करीत आहोत याला आळा बसावा आणि प्रत्येकाने एक तरी झाड लावावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील वाळकी गावातील डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर युवाज कासार व डॉ कोमल कासार यांची औषधी लिहिलेल्या चिठ्ठीवर असलेला संदेश सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.“आजारातून बरे झाल्यावर १ झाड लावा,म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही”

सध्या प्रत्येक रुग्ण ऑक्सिजन बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे तो आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल तपासून बघत आहे मात्र निसर्गात अमाप जंगल तोडीने जी ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आणि दिवसेन दिवस कमी होत आहे अश्यात प्रत्येकाला जर ऑक्सिजन घेण्या साठी सिलेंडर बाळगावे लागले तर या साठीच आम्ही झाडे लावण्याचा संदेश देत आहोत

-डॉ युवराज कासार
वाळकी, अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here