Home Breaking News सरकारने सचिन वाझे सारखे टार्गेट बुलडाणा एसपी, जिल्हाधिकारी यांना दिले काय- आ.आकाश...

सरकारने सचिन वाझे सारखे टार्गेट बुलडाणा एसपी, जिल्हाधिकारी यांना दिले काय- आ.आकाश फुंडकर

 

खामगाव -“वारे अजब महाविकास आघाडी सरकार, लोकांच्या जीवावर उदार शेतकऱ्यांना माल विकायला सकाळी 11 वाजेनंतर बंदी आणि दारू विकणाऱ्यांची दिवसरात्र चांदी. सदर दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करणार का? दुकान मालकाच्या विरुद्ध FIR करणार का? वाझे सारखेच एसपी बुलढाणा, जिल्हाधिकारी बुलढाणा व एकसाईज एसपी यांना पण शासनाकडून टार्गेट आहे का? नगरसेवक राकेश राणा यांच्या सतकर्तेमूळे अवैध दारू विक्रेत्यांचे पितळ उघड”असे ट्विट भाजपाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर(mla aakash fundkar) यांनी केले आहे.

आ. फुंडकर यांनी केलेलं ट्वीट

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये होम डिलिव्हरी देण्यासाठी निघालेला विक्रेता माणूस वाटेतच मद्य अर्थात देशी दारू विकत होता, ही माहिती मिळताच भाजपा नगरसेवकाने त्यास पकडले व पोलिसाच्या ताब्यात दिले. आज घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मद्य , देशी मद्य ,सौम्य बिअर आणि वाइन सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सीलबंद बाटलीतून घरपोच विकण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र दूध किराणा भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू मात्र सकाळी सात ते अकरा पर्यंत विकण्यासाठी परवानगी दिलेली आहे. याचा अर्थ जीवनावश्यक खाद्यपदार्थ दूध यापेक्षाही मद्यविक्री ही अधिक जीवनावश्यक असल्याचे राज्य सरकारला वाटत असावे. त्यामुळे मध्य विक्रीतून मिळणारा महसूल सोडण्यास राज्य सरकार सध्यातरी तयार नसल्याचे चित्र आहे. या साऱ्या बाबतचे राजकारण आणि पैशांची देव-घेव याबाबत माहिती घेतली असता सर्वच बियर बार आणि रेस्टॉरंट धारक ज्यादा किंमत लावून सध्या किरकोळ मध्ये विकत असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी 21 एप्रिल रोजी विक्रीबाबत नवीन आदेश काढला असून तीस तारखेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान आज शहरात भाजपा नगरसेवकाने एका दारू विक्री करणाऱ्या माणसाला पकडलं व त्यांचा व्हिडीओ वायरल केला.
अवैध दारू विक्रीमुळे कोरोना वाढत नसून नियम मोडून दारू विक्री करणाऱ्या संबंधित दुकानदराचा परवाना रद्द करावा अशी मागणीही भाजपा नगरसेवक राकेश राणा यांनी केली आहे. या सर्व घटनेवर भाजपाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी ट्विट करत सरकारवर उपरोक्त टीका केली आहे.

1 COMMENT

  1. कुंबेफळ, ता.खामगाव येथे सर्रास रोडवर्ती दारू विक्री चालू आहे पोलीस 11 नंतर कोणते दुकान उघडे दिसले तर कारवाही करतात पण दारू विक्री मात्र सर्रास चालू आहे भालेगाव कुंबेफळ रोड वरती कुंबेफळ बस स्टॉप समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here