Home खामगाव कोरोना अपडेट ‘त्या’ दानशुरांना सलाम; कोविड सेंटरसाठी मदतीचा हात

‘त्या’ दानशुरांना सलाम; कोविड सेंटरसाठी मदतीचा हात

खामगाव :- खामगाव येथील जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णाची वाढ पाहता भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नातून 40 बेडची अतिरिक्त व्यवस्स्था तातडीने सुरू करण्याचे युद्धस्तरावर काम अंतिम टाप्यात आहे. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडत आहे. हे लक्षात घेऊन 10 दिवसापूर्वी आ अँड आकाशदादा पुंडकर यांनी सामान्य रुग्णालयात तातडीने बैठक घेऊन रुग्णालयात अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्याचे आदेश स्थानिक रुग्णालय प्रशासनालाला दिले. तसेच या कामासाठी 5 लाख रुपयांचा निधी सुद्धा दिला. यानंतर पश्चिम बंगाल येथील निवडणूक प्रचारची जबाबदारी आटोपून आज 22 एप्रिल रोजी तातडीने सामान्य रुग्णालयात आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयात भेट देऊन रुग्णालय अधीक्षक डॉ वानखडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली. यानंतर त्यांनी अधिकारी यांचेसह नवीन कोरोना रुग्णांसाठी सुरू असलेल्या विस्तारित जागेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉ वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे, उद्योजक विपीनसेठ गांधी, पप्पूसेठ अग्रवाल, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा, नगरसेवक राकेश राणा, पवन गरड, गुणवंत खोडके, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आठवड्यात आणखी मोठा निधी देणार:- आ. अँड. फुंडकर

येत्या आठवड्यात अतिरिक्त नवीन 40 बेडची सर्व सुविद्धा युक्त व्यवस्था सामान्य रुग्णालयात सुरू होणार असल्याची माहीती यावेळी आ अँड आकाशदादा फुंडकर यांनी दिली, तसेच या रुग्णालयासाठी आणखी मोठा निधी एका आठवड्यात उपलब्द करून देऊअसे ठोस आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दानदाते आले पुढे

आ अँड आकाशदादा फुंडकर यांनी कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी मदत करण्याचे आवाहन सतत केले. त्याला मोठ्या प्रमाणात समाजसेवकांनी साथ दिली. उद्योजक विपीन सेठ गांधी यांनी तर कोविड तपासणी साठी स्वतंत्र प्रयोग शाळा उभाणीसाठी मोठे योगदान दिले. त्यानंतर अनेक समाजसेवकानी अनेक साहित्य उपलब्द करून दिले. आजही आ अँड फुंडकर यांच्या आवाहनांना शहरातील दानशूर लोक पुढे येत आहेत. आ अँड फुंडकर यांच्या संकल्पनेतून सामान्य रुग्णालयातील उपलब्द जागेतील कमी कामासाठी असलेल्या जागेत नवीन 40 बेडचे अतिरिक्त रुग्णालय उभे होत आहेत. यासाठी सुद्धा आ अँड फुंडकर यांचे आवाहनांवरून शहरातील 5 ते 6 दानशूर उद्योजक समाजसेवक लोकांनी लाखो रुपयांचा निधी दान स्वरूपात दिला. त्यामुळे येत्या 19 दिवसात सामान्य रुग्णालयात आणखी 40 बेड कोरोना रुग्णासाठी सुविधा युक्त व्यवस्था निर्माण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here