Home विकास वार्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खामगाव मतदारसंघासाठी दिला मोठा निधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खामगाव मतदारसंघासाठी दिला मोठा निधी

 

१५ कोटी निधि दिला, महत्त्वाची रस्ता कामे होणार!

खामगांव विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांची मजबूतीकरण व रुंदीकरणाची कामे आवश्यक़ होती याबाबत आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केंद्रीय मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी यांच्याकडे सदर रस्ता कामांना मंजूरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत खामगांव विधानसभा मतदार संघातील जवळपास 15 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरात देण्यात आली आहे. त्याबददल खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी मा.श्री नितीनजी गडकरी यांचे जाहीर आभार मानुन खामगांव विधानसभा मतदार संघातील जनतेकडून धन्यवाद मानले.


खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री आकाश फुंडकर यांनी खामगांव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील अनेक वर्षापासून प्रलंबीत अशा अत्यंत महत्वाच्या रस्ताचे मजबूतीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्री मा श्री नितीनजी गडकरी यांनी खामगांव विधानसभा मतदार संघातील रु 15 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरात दिली आहे. याबाबत त्यांनी पत्राव्दारे आमदार ॲड आकाश फुंडकर यांना सुचीत देखील केले आहे. या कामांमध्ये खामगांव मतदार संघातील 1 प्रमुख जिल्हा मार्ग 56 एमडीआर 15 वर्णा सारोळा, गेरु माटरगांव श्रीधर नगर हरनी वैरागड उंद्री रामा 222 ला जोडणारा रस्ता लांबी 17 किमी ते 24 किमी रु. 5.85 कोटी
2.एमडीआर 57 रामा 222 वैरागड ते झोडगा वझ्झ्र, रामा 222 गणेशपुर शि राळा निरोड ओडीआर 73 घारोड अकोली अडगांव रामा 269 ला जोडणारा कि मी 23 ते 30/400, किमी 30/400 ते 32/00 आणि 32 ते 33 किमी रु 4.43 कोटी
3.एमडी आर51रामा 222 माटरगांव. बेलुरा मोरगांव डिग्रस़, पहुरजिरा रामा 6 पारखेड ज्ञानगंगापूर ते एमडीआर13 ला जोडणारा रस्ता किमी 19 ते 28 पारखेड ते राहुड ते घाणेगांव नालीसह रु.9.00 कोटी
या कामांचा समावेश आहे.

संग्रहित छायाचित्र

या सर्व रस्ता कामांमुळे खामगांव मतदार संघातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरीकांना दळवळणास सोपे होणार आहे. तसेच येत्या काळात मतदार संघातील शेतकरी हे त्यांच्या शेतातील माल इतर बाजार पेठेस विकण्यास त्यांचा मार्ग सुकर होणार आहे.
त्यामुळे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकर यांचे जाहीर आभार मानले आहेत. या मंजूर कामांमुळे खामगांव मतदार संघातील ग्रामीण भागातील विकास कामांमध्ये अजून भर पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here