Home कोरोना अपडेट्स ‘वंचित ‘ ने उभारलं राज्यातील पाहिलं कोविड सेंटर’

‘वंचित ‘ ने उभारलं राज्यातील पाहिलं कोविड सेंटर’

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर’


अकोला : वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पाहिलं कोविड सेंटर अकोला येथे उभारलं आहे.हा उपक्रम राज्यातील अन्य जिल्हा परिषदांच्यासाठी निश्चितच अनुकरणीय असाच आहे.

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णाना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. अकोला येथे मोठं मोठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, तेथे सामान्य माणूस उपचार घेऊ शकत नाही, तर सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, यामुळे अकोला येथे रुग्णाना कोविड सेंटरची आवश्यकता होती.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अकोला येथे 50 बेड असलेलं सर्व सुविधा युक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. अकोला जिल्हापरिषदेच्यावतीने ऍड. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते 50 खाटांचे सुसज्ज कोविड सेंटरचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र सध्या कोविडच्या विळख्यात सापडला आहे, रोज होणारे मृत्यू चिंताजनक आहेत. सगळे पक्ष कोविड काळात राजकारण करीत आहेत आणि वंचित बहुजन आघाडी नुसतं बोलत नाही तर कृतीतून काम करत आहे. अकोला जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद आहे जिने ५० खाटांचे सुसज्ज कोविड-सेंटर ऊभारले आहे आहे. हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविला गेला तर राज्यातील कोविड सेंटरची संख्या वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here