Home क्राईम ‘जुली’ ने लावला खुनाचा छडा!

‘जुली’ ने लावला खुनाचा छडा!

रेल्वे रुळावरील ‘तो’ खूनच ; पत्नीच निघाली खूनी

शेगाव :नागझरी येथे खून झालेल्या इसमाची पत्नीच निघाली खुनी निघाली असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे.

शेगाव अकोला रेल्वे रुळावर नागझरी येथे जुन्या क्रॉसिंग लाईनवर 18 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली यावर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी नागझरी रोडवर राहणाऱ्या रेखा यामधून दांदळे यांना विचारले असता त्यांनी ओळख पटवून खात्री केली की मृतदेह त्यांच्या पतीचा आहे यावर त्यांनी रेल्वे पोलिसांकडे फिर्याद दिली होती की अज्ञात व्यक्तीने त्यांना ठार मारुन रेल्वे रुळावर टाकले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बुलढाणा येथून शॉन पथकाचे पाचारण करण्यात आले यावेळी शॉन पथकातील जुली या शॉनाने महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे घटनास्थळावरील मृतदेहाच्या जवळून सरळ जुली ही मृतकाच्या घरी जाऊन थांबली जुली च्या आधारावर रेल्वे पोलिसांनी तपास चक्र फिरविले त्यामध्ये मृतक रामधन दांदळे याची पत्नी रेखा दांदळे व तिचा साथीदार संतोष साठे हा संशयामध्ये आढळला त्यावरून चौकशीअंती यामधून रायधन दांदळे यांचा खून त्यांनीच केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे तरीसुद्धा या प्रकरणात अधिक संशय वाटत असून शेगाव रेल्वे पोलिसांकडून या सुन करणाची अधिक चौकशी सुरू आहे त्यामुळे या या घटनेमध्ये आणखी आरोपी निघण्याची शक्यता असू शकते. घटनेचा अधिक तपास रेल्वे एपी आय सागर गोडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here