Home महाराष्ट्र पोलीस कुणाचीही गय नाही- विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना; बुलडाणा घटनेचा आढावा

कुणाचीही गय नाही- विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना; बुलडाणा घटनेचा आढावा

बुलडाणा :शिवसेना आमदार संजय गायकवाड व भाजपचे आमदार संजय कुटे यांच्यातील वादाचा व संपूर्ण घटनेचा विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आढावा घेतला. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता कुणाचाही गय केली जाणार नाही असे त्यानी सांगितले. सांगितले आहे
19 एप्रिल रोजी भाजपा आमदार संजय कुटे आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्‍यातील राजकीय वादामुळे अवघे शहर आणि जिल्ह्याची पोलीस यंत्रणा वेठीस धरल्या गेली होती. कुटेंनी विषयावर पडदा टाकूनही सायंकाळी पुन्‍हा त्‍यांच्‍यावर दगडफेक झाली. तर परतताना मोताळ्यातही हल्ल्‍याचा प्रयत्‍न झाला. या घटनांची गंभीर दखल घेत अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना हे रात्रीच बुलडाण्यात दाखल झाले होते. आज (मंगळवारी) सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली आहे.

गायकवाडांशी विशेष पोलीस महानिरीक्षकांची चर्चाआमदार संजय गायकवाड यांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलाविण्यात आले होते. त्‍यांच्‍याशी विशेष पोलीस महानिरीक्षक मीना यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. चर्चानंतर आमदार संजय गायकवाड यांनी हा विषय संपला असल्याचे सांगितले आहे. तर आ. कुटे यांनी फेसबुक लाईव्ह करून शांततेची भूमिका जाहीर केली.

 

आमदार गायकवाड, आमदार कुटे प्रकरणाचा आढावा घेवून विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना या संपूर्ण प्रकरणातील आरोपींची गय केली जाणार नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे. 10 लोकांवर गुन्हा दाखल केले असून त्यांना अटकही करण्यात आल्याचे सांगितले आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने बुलडाण्यात आलेले विशेष महानिरीक्षक चंद्रशेखर मीना यांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयात जाऊन भेट घेतली. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here