Home विदर्भ आता ‘तो’ विषय ‘डिलिट’ करा- आ. संजय कुटे

आता ‘तो’ विषय ‘डिलिट’ करा- आ. संजय कुटे

 

जळगांव जा: बुलडाणा येथील विषय आपल्यासाठी संपला असे संगत, भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट,टीका करू नये असे आवाहन जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार माजी मंत्री संजय कुटे यांनी केले.

बुलडाणा येथील सोमवारी तणाव व अन्य घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आज फेसबुक लाइव्हवर संवाद साधला. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यामुळे वेळोवेळी पदांवर काम करण्याची संधी दिली आहे चार वेळेस जळगाव मतदारसंघातून आमदार झालो पालकमंत्री पण झालो आणि त्यामुळे कार्यकर्तेना मी कधीही वीस वर्षांमध्ये माझ्या स्वार्थासाठी राजकारनासाठी भांडण करा असे म्हटले नाही कार्यकर्ता हासुद्धा एक चांगल्या प्रकारे पुढे गेला पाहिजे चांगल्या कामांनी पुढे गेला पाहिजे ही माझी शिकवण आहे कार्यकर्ते मुलांसारखी असतात त्यामुळे त्यांचा गैरवापर होईल असे कृत्य माझ्या कडून घडले नाही व घडणार नाही.
कार्यकर्तेना माझी नम्र विनंती आहे की कोण मोठा कोण लहान झाला आहे या विषयावर आपण जाऊन नये, जनतेला माय बाप मानून जनतेवर सोडून द्यायचं जनता सगळे बघत असते त्यामुळे हा विषय आपल्यासाठी संपलेला आहे या जिल्ह्यात वातावरण चांगला राहावं हाच माझा उद्देश आहे दोन दिवसांमध्ये जनतेच्या सेवेमध्ये आपण कुठे तरी कमी पडलो तेव्हा या क्षणापासून हा समग्र विचार बाजूला काढायचा हे सर्व डोक्यातून डिलीट करायचे आहे नवीन ऊर्जेने जनतेच्या कोरोना सेवांमध्ये कामांमध्ये मदत कार्याला लागावे. जिथे ज्या नागरिकाना मदत लागेल ती द्यावी जिल्ह्यांमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोविड सेंटर निर्माण करायचे त्याचे नियोजन दोन-तीन दिवसांमध्ये बनवतो आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून आयसोलेशन वॉर्ड निर्माण करता येतील का त्याबद्दल सुद्धा विचार चालू आहे आपण आपल्या कामाला जुंपलं पाहिजे त्या पद्धतीने आपण पुढे काम करताना एक लक्षात ठेवा खालच्या दर्जाचे खालच्या पातळीवरचे विचार पोस्ट करू नये अशी विनंती सुद्धा कार्यकर्त्यांना आ. कुटे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here