Home Breaking News आ. कुटे यांची गाडी अडविल्या प्रकरणात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

आ. कुटे यांची गाडी अडविल्या प्रकरणात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

खामगाव: भाजपा आ.डॉ.संजय कुटे यांच्या वाहनवार हल्ला प्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून भाजप व शिवसेनेत वाद सुरू आहे. दरम्यान शिवसेना आ. संजय गायकवाड यांनी खुले आव्हान दिल्यावर भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे सोमवारी भाजपा कार्यकर्ते सोबत घेऊन बुलडाणा आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून आ.संजय गायकवाडांविरुद्ध कडक कारवाईची मागनी केली. दरम्यान कुटे येताना आ.गायकवाड यांच्या कार्यलयापासून पायी आले, जातांना त्याठिकाणी कुटे यांच्या गाडीवर गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या. बुलडाणा येथे वाद संपला असे जाहिर करून परत जात असताना आ.डॉ.संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे कुटे यांनी ट्विटवर पुन्हा मी परत येतोय हिम्मत असेल तर अडवून दाखवा असे म्हणत आ. गायकवाड यांना अटक होत नाही तोवर बुलडाणा सोडणार नाही, असे सांगत बुलडाणा येथे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असून भाजपा कार्यकर्ते यांनी आहे तेथूनच आपल्या गावी परत जावे असे आवाहन केले आहे.बुलडाणा येथे आ. संजय कुटे परत आले. आरटीओ ऑफिस पासून आ. कुटे व कार्यकर्ते पायी चालत आ. गायकवाड यांच्या ऑफिस समोर आले. तेथे भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा दिल्या. यावेळेस कडक बंदोबस्त तैनात होता. त्यांनंतर आ.संजय कुटे जिल्हा पोलीस अधीक्षक ऑफिस समोर कार्यकर्त्यांसह ठिय्या देवून बसले असून आ.संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी त्यानी केली आहे. मोताळा येथे सुद्धा कुटे यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान काल आ. कुटे यांच्या वाहन ताफ्याचा रस्ता अडविल्या प्रकरणी आरोपी पृथ्वीराज गायकवाड व इतर ४ जणांना अटक करण्यात आली. सदर आरोपींना बेल मिळाली असून आरोपी विरुद्ध अ प नं. २७७ / २०२१ कलम ३४१, १४३, १८८, २६९, २७० प्रमाणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here