Home Breaking News आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपाचे विरोधी पक्षनेते,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना माध्यमांसमोर जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आणि जनतेची दिशाभूल केल्याबद्दल भाजपा मुंबईचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रसाद लोढा ( Mangal Prabhat Lodha) यांनी ही तक्रार दाखल केली.

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, अशी टीका बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी केली होती.महाराष्ट्रात कोरोना साथीचा कहर सुरू आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपची मंडळी खिल्ली उडवीत आहेत. भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे, असा आरोप बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते त्यांनंतर वाद सुरू झाला. दरम्यान रविवारी व सोमवारी दोन बुलडाणा जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेत पुन्हा राडा, मारहाण, पुतळे जाळणे असे प्रकार झाले बुलडाणा येथून परत जात असताना माजी मंत्री आ.संजय कुटे यांच्या गाडीवर शिवसैनिकानी दगडफेक करून काचा फोडल्या त्यांनतर बुलडाणा येथे तणाव वाढला होता, उशिरा हे प्रकरण मिटले. दरम्यान आता या घटनेचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत, महाराष्ट्र भाजपाने यासंदर्भात आ.संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणीही केली आहे. तर मुंबई मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here