Home Breaking News शिवसेना भाजपच्या राड्याचा आज दुसरा एपिसोड; वाचा संपूर्ण १० अंकी घटनाक्रम

शिवसेना भाजपच्या राड्याचा आज दुसरा एपिसोड; वाचा संपूर्ण १० अंकी घटनाक्रम

माजी मंत्री कुटे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या; एसपी ऑफीस समोर ठिय्या
बुलडाणा : जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेत काल पासून राडा सुरू आज बुलडाणा येथे पुन्हा राडा झाला. बुलडाणा येथून परत जात असताना माजी मंत्री आ.संजय कुटे यांच्या गाडीवर शिवसैनिकानी दगडफेक करून काचा फोडल्या त्यांनतर बुलडाणा येथे तणाव वाढला असून ठिक ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान ,आ.संजय कुटे जिल्हा पोलीस अधीक्षक ऑफिस समोर कार्यकर्त्यांसह ठिय्या देवून बसले असून आ.संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी त्यानी केली आहे.

असा आहे घटनाक्रम
१) आ. संजय गायकवाड यांचे वक्तव्य
मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, अशी टीका बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी केली होती.महाराष्ट्रात कोरोना साथीचा कहर सुरू आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपची मंडळी खिल्ली उडवीत आहेत. भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे, असा आरोप बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते त्यांनंतर वाद सुरू झाला

२) भाजपा सेनेत राडा
बुलडाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांना उद्देशाने केलेलं व्यक्तव्य जिल्ह्यात व राज्यात चांगले चर्चेत आले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी आमदार संजय गायकवाड़ यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या भाजपा नेते आणि पदधिकार्यांना शिवसेना कार्यकर्त्यांच्या संतापला सामोरे जावे लागले. भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजपा कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढविला. १८ एप्रिल रोजी दुपारी वाजेदरम्यान ही घटना घडली. दरम्यान शहर पोलिस स्टेशन गाठून परस्परात विरुद्ध तक्रारी देण्यात आल्या आहेत. त्यावरून दोन्ही कडील लोकांवर विवीध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

३)आ. गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन

जळगांव जा. येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक १८ एप्रिल रोजी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर  शिवसेना आ. संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन केले गेले.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ.डॉ. संजय कुटे यांनी पत्रकार परिषद घेतली. बुलढाणा जिल्हा म्हणजे जिजाऊ चे जन्मस्थान,सुसंस्कृत जिल्हा,येथील विकृत मनोवृत्तीच्या मवाली आमदाराने देशाचे पंतप्रधान,माजी मुख्यमंत्री यांच्या विषयी अतिशय शिवराळ,गलिच्छ भाषेत वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन करून दिले. अशा आमदारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंदोबस्त करावा ,तसे न केल्यास शिवसेनेची सुद्धा हीच संस्कृती आहे असा समज महाराष्ट्रभर पसरेल. पंतप्रधाना सारख्या नेत्यांबद्दल असभ्य वर्तन करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या मवाली आमदारावर गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा गर्भित इशारा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे यांनी दिला. कुटे यांनी गायकवाड यांचा उल्लेख ‘मवाली
आमदार’ असा केला. जिल्ह्यातील विविध ठिकाणी आ. गायकवाड यांचा पुतळा जाळण्यात आला.

४) खामगाव येथे आ.संजय गायकवाड यांचा पुतळा जाळणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

५)आ.गायकवाड पुन्हा आक्रमक

दरम्यान कुटे पत्रकार परिषद झाल्यावर आ.संजय गायकवाड पुन्हा आक्रमक होत समोर आले. ‘टिनपाट आमदार संजय कुटे माझा पुतळा काय जाळता हिम्मत असेल तर समोर येवून दाखवा, संजय गायकवाड काय आहे हे दाखवून देतो’ असे ते म्हणाले आहे. तर कुटे यांना बेवडा आमदार असे त्यांनी संबोधले.

राडा पार्ट – 2 ( दुसरा दिवस)

६) शिवसेनेचे प्रतीउत्तर
दरम्यान आ. संजय गायकवाड यांना समर्थन देण्यासाठी शिवसैनिक सुद्धा पुढे आले. ठिक ठिकाणी प्रदर्शन करण्यात आले. खामगाव लोणार सह जिल्ह्यात आ.गायकवाड यांच्या समर्थनसाठी निवेदन देऊन पुतळे जळणाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

७) फडणवीस यांचा व्हिडिओ वायरल

बुलडाणा घटनेचे पडसाद राज्यातील विविध ठिकाणी उमटले. भाजपच्या वतीने आ.संजय गायकवाड यांचा निषेध करण्यात आला. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया असलेला व्हिडीओ वायरल झाला. त्यात आ.गायकवाड यांना तळीराम संबोधले गेले. हा व्हिडीओ जिल्ह्यातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला.

८) कुटे यांची गाडी फोडली
आ. संजय गायकवाड यांनी खुले आव्हान दिल्यावर माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे आज भाजपा कार्यकर्ते सोबत घेऊन बुलडाणा आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून आ.संजय गायकवाडांविरुद्ध कडक कारवाईची मागनी केली. दरम्यान कुटे येताना आ.गायकवाड यांच्या कार्यलयापासून पायी आले, जातांना त्याठिकाणी कुटे यांच्या गाडीवर गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या.

९)आ.कुटे पुन्हा बुलडाण्यात

बुलडाणा येथे वाद संपला असे जाहिर करून परत जात असताना आ.डॉ.संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे कुटे यांनी ट्विटवर पुन्हा मी परत येतोय हिम्मत असेल तर अडवून दाखवा असे म्हणत आ. गायकवाड यांना अटक होत नाही तोवर बुलडाणा सोडणार नाही, असे सांगत बुलडाणा येथे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असून भाजपा कार्यकर्ते यांनी आहे तेथूनच आपल्या गावी परत जावे असे आवाहन केले आहे.

१०)एसपी ऑफीसमोर ठिया
बुलडाणा येथे आ. संजय कुटे परत आले. आरटीओ ऑफिस पासून आ. कुटे व कार्यकर्ते पायी चालत आ. गायकवाड यांच्या ऑफिस समोर आले. तेथे भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा दिल्या. यावेळेस कडक बंदोबस्त तैनात होता. त्यांनंतर आ.संजय कुटे जिल्हा पोलीस अधीक्षक ऑफिस समोर कार्यकर्त्यांसह ठिय्या देवून बसले असून आ.संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी त्यानी केली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here