Home राजकारण भलतंच, फडणविसांच्या निषेधासाठी चक्क फोडलं ‘टरबुज’

भलतंच, फडणविसांच्या निषेधासाठी चक्क फोडलं ‘टरबुज’

लोणार (बुलडाणा) :कोरोना परिस्थिति गंभीर असतांना देखील राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गलिच्छ राजकारण करून राज्यातील जनतेला मृत्यू च्या दारात ओढ़त असल्याने त्यांच्या या वृत्तिचा आज लोणार तहसील समोर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने टरबुज फोडून निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा बळीराम मापारी , कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापति शिवशंकर तेजनकर, कुंडलस से उपसरपंच गजानन मापारी, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, सुनील मापारी, गोविंद सोनुने, सह शिवसैनिक उपस्थित होते .यावेळी जिल्हा प्रमुख प्रा बळिराम मापारी यांनी सांगितले की राज्यावर यापूर्वी जेव्हा केव्हा नैसर्गिक तसेच अनैसर्गिक, भुकुंप, दहशतवादी हल्ले,यासारखी कितीतरी संकटे आली त्या – त्या वेळी सत्तेतिल सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकत्र बसून त्या संकटांवर यशस्वी रित्या मात केली. आज ही कोरोना परिस्थितित सहकार्य करण्याचे सोडून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण करून राज्यातिल जनतेला उकसविन्याचे काम करत आहे. कोरोनाची संधी साधुन विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपला सत्तेत बसन्याचे भयंकर स्वप्न पडू लागले आहे. मात्र तसे होणार नाही कारन कोंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्वरावजी ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाआघाडीचे हे सरकार स्थिर आहे. राज्यात इंजेक्शन, ऑक्सीजन, आईसीयू बेड, डॉक्टर, नर्स, औषधांचा, तुतवडा निर्माण झाला झाल्यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्ण पणे कोलमडुन पडली आहे.अशाही परिस्थितित राज्याचे संयमी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे राज्याला कोरोनातून सावरन्याचे काम करत असतांना राजकरण करून राज्यातील महाआघाडीचे मजबूत सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा आणि विरोधी पक्ष नेते यांनी कितीही खटाटोप केला तरीही त्यांना यामध्ये कधीही यश मिळणार नसल्याचे जिल्हा प्रमुख प्रा. मापारी यांनी सांगितले.कोरोनाने राज्यातील परिस्थिति अत्यंत गंभीर बनत चालली आहे वेळेवर उपाय योजना न केल्यास कितीतरी नागरिकांना प्राणवायु आभावि आपला जीव द्यावा लागणार आहे. यामुळे परिस्थिति चे गांभीर्य लक्षात घेऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारन न करता जवाबदारीने वागण्याची गरज असल्याचे ही यावेळी प्रा मापारी यांनी सांगितले आहे
यावेळी जिल्हा प्रमुख प्रा मापारी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदना द्वारे तहसीलदार नदाफ यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here