Home Breaking News खामगावमध्ये जाळला आ. संजय गायकवाड यांचा पुतळा

खामगावमध्ये जाळला आ. संजय गायकवाड यांचा पुतळा

माजी आमदार विजयराज शिंदे व भाजपा च्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध –आ.आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष भाजपा

पोलीस प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी

खामगांव येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून आ.संजय गायकवाड यांचा पुतळा जाळून निषेध

खामगांव – पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह व नीच असे विधान बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार श्री.संजय गायकवाड यांनी केले असा आरोप करत त्याच्या निषेधार्थ भाजपा च्या वतीने लोकशाही पद्धतीने सुरु असेलेल्या आंदोलनात आमदार पुत्राने माजी आमदार विजयराज शिंदे व भाजपा च्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध करतो व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे पोलीस प्रशासनाला आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.
संपुर्ण देशात कोरोना परिस्थिती हाताळण्यात ज्या पंतप्रधानांचे नांव जगभर कौतुकाने घेतल्या जाते त्या पंतप्रधानांबददल व राज्यात रेमडिसीवर या इंजेक्शनचा पुरवठा असो वा ऑक्सीजन पुरवठा असो याबाबत पुढाकार घेऊन पाठपुरावा करुन जनतेसाठी ते उपलब्ध करुन देणारे राज्याचे विरोधी पक्ष नेता मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबददल संपुर्ण राज्यात महा विकास आघाडी सरकार मधले मंत्री व आमदार सवंग प्रसिध्दीसाठी बिन बुडाचे व विवादास्पद विधाने देऊन इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये प्रसिध्दीच्या झोतात येऊ पाहत आहेत. हे विधान करुन ते जनतेचे लक्ष विचलीत करीत आहेत.
या आघाडी सरकारच्या काळात सुरु असलेला भ्रष्ट़ कारभार व कोटयावधीच्या खंडणी प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या सरकारला वाचविण्यासाठी या सरकारमध्ये मंत्री हे केंद्र सरकार नरेंद्र मोदी पंतप्रधान व देवेंद्र फडणवीस यांच्या बददल आक्षेपाहर्य विधाने करुन जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या घटनेच्या ‍निषेधार्थ संपुर्ण जिल्हाभरात भाजपाच्या वतीने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा पुतळा जाळण्यात आला. खामगांव भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील संजय गायकवाड यांचा पुतळा जाळण्यात आला व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा जिल्हा सचीव संजय शिनगारे, राजेंद्र धनोकार, जितेंद्र पुरोहित,गणेश जाधव, पवन गरड, अशोक हटटेल, यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here