Home Breaking News आठवडाभरात दोन लाचखोर अधिकारी ‘ACB’ च्या जाळ्यात

आठवडाभरात दोन लाचखोर अधिकारी ‘ACB’ च्या जाळ्यात

 

अकोला: आठवडाभरात एका पाठोपाठ एक दोन अधिकारी लाचखोरी प्रकरणात ACB’ च्या जाळ्यात अडकले आहेत.

अकोला येथील तहसील कार्यालयात कार्यरत पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर याने साडेपाच हजारांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी ७ एप्रिल रोजी एसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. अटकेनंतर त्याची कसून चौकशी केल्यावर अकोल्याचे तहसिलदार लोखंडे या प्रकरणात सामील असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळले. या आधारे तहसिलदार लोखंडे याला अटक करण्यात आली.
कोरोना काळात वाटप केलेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी १० टक्के याप्रमाणे पाच हजार पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला कळसकर याने केली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर याला अटक केली होती. कळसकर पोलीस कोठडीत असताना त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. यानंतर या लाचखोरी प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार लोखंडे याला ताब्यात अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.

शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.

समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.

-श्री. रजनिश सेठ, भा.पो.से.,
महासंचालक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
महाराष्ट्र राज्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here