Home Breaking News आजची धक्कादायक कोरोना रूग्ण संख्या वाचून तुम्हीच ठरवा कसं जगायचं?

आजची धक्कादायक कोरोना रूग्ण संख्या वाचून तुम्हीच ठरवा कसं जगायचं?

बुलडाणा: जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 1285 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ही आकडेवारी चिंतेचा विषय असून शुक्रवारी 6 जण कोरोनाने मृत्यूमुखी पडले आहेत.
16 एप्रिल काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 1285 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.विशेष म्हणजे एकट्या बुलडाणा तालुक्यातील रुग्ण संख्या 259 ते मेहकरमध्ये 204 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे. 1 मे पर्यत लॉकडाऊन वाढवून देण्यात आले आहे.

6 जणांचा झाला मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील मृत्यू दर सुध्दा वाढत असून शुक्रवारी 6 जण दगावले आहेत. जिल्ह्यातील मृत्यू 328 झाले आहेत. लॉक डाऊन काळात नियम पाळण्यात येत नसल्यामुळे रुग्ण वाढत आहेत. येणारा धोका ओळखून नागरिकांनी मास्क वापर, गर्दी टाळणे, हात स्वच्छ ठेवणं हे करणे गरजेचे झाले आहे.

आजची तालुका निहाय आकडेवारी

▪️बुलडाणा: 259 ▪️खामगाव: 76
▪️शेगाव : 50 ▪️दे. राजा : 60
▪️चिखली : 126▪️मेहकर : 204
▪️मलकापूर: 51▪️नांदुरा : 87
▪️लोणार : 101▪️मोताळा : 115
▪️जळगाव जा : 68 ▪️सि. राजा: 85
▪️संग्रामपूर : 01

एकूण टेस्ट: 6869 पॉझिटिव्ह: 1285
निगेटिव्ह : 5518 पुअर स्वाब: 66

आता इलाज एकच करा…

कोरोनाने रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत असली तरी आता प्रत्येकाने आत्मचिंतन करुन वागणं गरजेचे आहे। स्वतः ची काळजी घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतः ला संसर्ग होणार नाही ह्याबाबत दक्षता घेणे हाच एक उपाय आता आपल्या आहे. त्यासाठी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडणे,
अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर निघालेच तर तोंडाला मास्क, गर्दीत न जाणे आणि सॅनिटायझर व साबनाणे हात स्वच्छ ठेवणे ही त्रिसुत्री पाळणे आवश्यक आहे.
विचार करा..आपली एक चूक घरात कोरोना आणि त्यासोबतच मृत्यू आणू शकते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here