Home विदर्भ शेगाव – नागझरी – अकोला मार्ग दुरुस्तीकडे का होतंय दुर्लक्ष!

शेगाव – नागझरी – अकोला मार्ग दुरुस्तीकडे का होतंय दुर्लक्ष!

शेगांव अकोला मार्ग म्हणजे माय जेऊ घालीना मावशी भिक मागु देईना…
नंदु कुळकर्णी
शेगांव16एप्रील
संत नगरी शेगावच्या सर्वात जवळचे महानगर म्हणजे अकोला आज या ठीकाणी जातांना रसत्याचा शंभर वेळा विचार करावा लागतो म्हणुन नागरीक म्हणतात माय जेऊ घालीना आणि मावशी भिक मागु देईना
संत नगरी शेगांव चे अकोल्याशी ईतके जवळचे नाते ऋणानुबंध आहेत कि शेगांव जरी बुलढाणा जिल्हयात असले तरी बाहेरच्या शेगांव अकोल्यात असल्याचेच वाटते शिक्षण नौकरी कामधंदा छोटेमोठे व्यापार दवाखाने औषधे MIDC रेल्वे सुविधा हे व असे अनेक मुद्दे शेगांवकरांना अकोल्यात ओढुन नेतात तर संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त जेव्हढे अकोल्यात आहे कदाची कुठल्याही च नाहीत
त्यामुळे शेगांव अकोला ईतकि रहदारी ईतर कोणत्याही गावांची नाही तुम्हि कधीही बस स्टँन्डवर गेले तर पहाटे पाच तर रात्री बारा वाजे पर्यत बसेस ची सतत येजा तीही भरगच्च सुरू असते शेगांव मधे गच्च भरलेली रेल्वे अकोल्यात रिकामी अकोल्यात गच्च भरलेली रेल्वे शेगांव मधे हमखास रिकामी होते त्या व्यतीरीक्त शेगांव लोहारा निंबा निमकर्दा अकोला ला मार्ग डांबरी रस्ता शेगांव जवळा बाळापुर हायवे शेगांव नागझरी गायगांव अकोला हा मधला मार्ग असे अनेक वाहतुकिचे मार्ग प्रवासी दिवसरात्र वापरतात त्यामुळे प्रचंड वाहतुक असुनही ताण नव्हता त्यामुळे शेगांवमधला माणुस अकोल्याला जाऊन आला तरी समजतच नाही अकोल्यातले भक्त संत गजाननाच्या दर्शनासाठि आपले रोजचे कामधाम आटोपुन संद्याकाळी दर्शन घेऊन रात्री जेवायला घरी जाऊ शकायचे
परंतु गेल्या वर्षभरा पासुन सगळीच कुचंबना होत आहे रेल्वे पँसेंजर बंद आहेत ईतर स्पेशल रेल्वे आहेत त्याचे जनरल टिकिट नाही त्यामुळे या दोन्हि गांवातील गरजवंतांनी रेल्वे स्टेशनचे तोंडच पाहीले नाही व्यापरी आणि नौकरदार आणी पेशंट यांची येजा सुरू आहे त्यामुळे त्यांनी शेगांव नागझरी निमकर्दा गायगांव अकोला मार्ग निवडला हा रस्ता शेगांव अकोला केवळ 34किलो मी आहे परंतु हायरे दैवा नुतणीकरणाच्या नांवाखाली तो रस्ता जिकडेतिकडे वर्ष झाले खोदुन ठेवला ना धड नवीन झाला ना जुना रस्ता धडाचा ठेवला त्यामुळे शेगांव जवळा बाळापुर बायपास निवडला हा रस्ता 45कि मी आहे तर तो शेगांव जवळा एकदम सुपर झाला परंतु बाळापुरच्या बायपाच्या आधी एकदोन किलो मिटर वळण मार्गाच्या नावे खाली जुना रस्ता नवीन केला नाही आणी नवीन रस्ता तयार झाला नाही त्यामुळे अत्यंत खड्याच्या खडखडाटातून मार्ग काढत प्रवासी जातात शेगांव लोहारा निंबा हा रस्ता शेवटि निमकर्दा येतो तो शेगांव नागझरी सारखा खोदुन ठेवला मधे वर्षभर एसटी बंद होती त्यामुळे जर शेगांव वरुन अकोला किंवा अकोल
यातुन शेगांव यायचे तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही जितका आनंददायक हा रस्ता होता आता त्रासदायक वाटतो
ईकडुन आढ तर कडुन विहीर ची म्हण तंतोतंत लागु होते आणी शेगांवचा जिल्हा बुलढाणा त्याचे शेवटचे टोक शेगांव अकोल्याशी जोडलेले परंतु अकोल्या वाल्याचे शेगांव हद्दीत काही चालत नाही शेगांवचे खासदार शिवसेनेचे अकोल्याचे भाजपचे यांचा मतदार संघ संपतो त्यांचा सुरु होतो समन्वयाचा आभाव शेगांवचे पालकमंत्री डॉ शिंगणे साहेब त्यांचे शेवटचे टोक पुढे जिल्हा बदल तर अकोल्याचे बच्चु कडु साहेब ते अमरावती जिल्हयाचे त्यांचे ईकडे काही नाही अकोला ग्रामीण अँड आंबेडकरांच्या वंचीत कडे त्याचे वंचीत त्यामुळे मर्यादित अधिकार मरण संत नगरीच्या नागरीकांचे ईतके तोलामोलाचे नेते असतांना संत नगरी आपल्या हक्का पासुन वंचीत आणी
संत नगरीचा आर्त आवाज कोणीतरी ऐकावा असे संत गजानन भक्त प्रार्थना करुन थकले आणी निमुट सहनशिलता अंगात आणुन मिळेल जमेल त्यावाटेने अकोला नाईलाजास्व गाठत आहेत कारण बुलढाणा माय आणि अकोला मावशी दोन्हि कडचा माणुस मात्र उपाशी आहे
तरी नेत्यांनी एकत्र येऊन जनतेचा आवाज एकावा अशी रास्त मागणी जनतेची असुन कोणतातरी एक तरी मार्ग जाण्या येण्याच्या लायक बनवावा अशी मागणी करत आहे

अकोला शेगाव रस्ता रहदारीस फार फार त्रासदायक झालेला आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असुन रस्ता मोठ्या प्रमाणात फूटलेला आहे.हा मार्ग महत्वाचा आहे .
रस्ता दुरूस्तीचे आदेश त्वरित द्यावेत हिच अपेक्षा अशी मागणीही माजी मंत्री सुबोध सावजी यांनी अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चू कडू यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here