Home खामगाव तालुका प्रा. गुंजकर यांच्या बीए, बीकॉम,बीएस्सी सिनिअर कॉलेजला मान्यता

प्रा. गुंजकर यांच्या बीए, बीकॉम,बीएस्सी सिनिअर कॉलेजला मान्यता

 

खामगाव-गुणवत्तापूर्ण व विश्वसनीय शिक्षणाचे दालन म्हणून नाव लौकिक मिळविलेल्या प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर व गुंजकर ज्यनिअर कॉलेज आवार येथे आता बीए, बीकॉम व बीएस्सी च्या सिनिअर कॉलेजला मान्यता मिळाली आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था झाली आहे.
सिनिअर कॉलेजच्या मान्यतेसाठी राज्य शासनाकडे अनेक शिक्षण संस्थेचे प्रस्ताव प्रलंबित होते. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नुकतेच यातील काही संस्थेच्या प्रस्तावावर सिनिअर कॉलेजला मान्यता दिली आहे. यात प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्थेच्या गुंजकर कॉलेज आवारचा समावेश आहे. आवार सारख्या ग्रामीण भागात सिनिअर कॉलेजला मान्यता मिळणे ही खरोखर खूप अभिमानस्पद बाब असून यामुळे खामगाव तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवल्या गेला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या प्रा.रामकृष्ण गुंजकर सर यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता 2017 पासून आवार येथे जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर अँड गुंजकर सायन्स व कॉमर्स कॉलेज सुरू केलेले आहे. अल्पवधीतच या संस्थेने विद्यार्थी व पालकांचा विश्वास संपादन केला. या हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आवार येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गुंजकर सरांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवत येथे आता बीए, बीकॉम,व बीएस्सी सिनिअर कॉलेजला मान्यता मिळविली आहे. येथे लवकरच नवीन सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती प्रा. गुंजकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here