Home जळगाव जामोद तालुका …आणि मध्यरात्री लागली अचानक आग

…आणि मध्यरात्री लागली अचानक आग

सुनगाव येथे घरावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे स्पार्किंग होऊन मध्यरात्री घराला लागली आग आगीमध्ये जीवनावश्यक साहित्यासह हजारोंचे नुकसान.

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे लागली आज शुक्रवारी मध्यरात्रीच्या दोन ते अडीच दरम्यान घरांवरील विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे घनश्याम राजपूत यांच्या घराला भीषण आग आगीमध्ये जीवनावश्यक साहित्यासह घरातील भांडी कपड्यांसह धान्य जळून खाक सविस्तर असे की सुनगाव येथील घनश्यामसिंह राजपूत यांच्या घराला आग लागल्याचे शेतातून आलेले शाम इंगळे, अक्षय गिऱ्हे,अमोल ढगे,अनिल वसुलकार,अर्जुन ढगे यांना घराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा करून तसेच घनश्याम सिंह राजपूत यांना झोपेतून उठवून आग लागल्याची कल्पना दिली व या चौघांनी मिळून घरातील गॅस सिलेंडर पटकन काढून बाहेर आणला तोपर्यंत आग एवढी भडकली होती की आगीच्या ज्वाळा दहा ते पंधरा फुटापर्यंत वर दिसत होत्या यांच्या आरडाओरड्याने घरा शेजारील नागरिक जागे झाले व त्यांनी आपापल्या घरातील जे हातात येईल त्या भांड्याने पाणी आणून आगीच्या भक्ष्यस्थानी असलेल्या घरावर पाणी फेकने चालू केले. शॉर्टसर्किट घरावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे झाल्याचे लक्षात येताच अनिल भगत व शाम इंगळे यांनी विद्युत डीपी बंद केली त्यामुळे शॉर्टसर्किट होणे बंद होऊन पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. जवळपास एका तासाने नागरिकांच्या या अथक प्रयत्नांना यश आले व आगीवर नियंत्रण मिळविले. आग एवढी भयंकर लागली होती की संपूर्ण वस्ती जळून खाक झाली असती आगीमध्ये घनश्यामसिंह राजपुत यांचे स्वयंपाक घर जळुन खाक . शेता मधून आलेल्या या चौघांच्या समयसूचकता आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चौघा मुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला असे नागरिक त्या ठिकाणी बोलत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथीलच श्रीराम इंगळे, अनिल तिवारी, बळीराम इंगळे, गजानन जवंजाळ, पुर्णाजी धुळे ,संजय निमकर्डे पांडुरंग इंगळे उमेश कुरवाडे, गणेश कतोरे,अनिल वसूलकार,अक्षय गिऱ्हे, अमोल ढगे, अर्जुन ढगे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी आग विझविण्याचा मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here