Home कोरोना अपडेट्स बंद शटरआड ‘चुकीचे काम’ व्यापाऱ्याला पडले महागत

बंद शटरआड ‘चुकीचे काम’ व्यापाऱ्याला पडले महागत

खामगाव : बंद शटरआड चुकीचे काम करून नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्याला खामगाव पोलिसांनी चांगला हिसका दाखवला आहे. आज 15 मे रोजी शहरातील मुख्य बाजार पेठेत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. असे असतानाही शहरात अनेकांकडून नियमांचे उल्लंघन केल्या जात आहे.

खामगाव शहरात शटर बंद मात्र छुप्या मार्गाने दुकान चालु ठेवून ग्राहक केल्या जात आहेत. दरम्यान आज दुपारी ४ वाजता खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर, मुख्याधिकारी मनोहर आकोटकर, उपमुख्याधिकारी श्री.सुर्यवंशी यांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी व नगर पालिकेच्या पथकासह शहरात फिरून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांना समज दिली तसेच परवाणगी नसताना दुकान उघडी ठेवणाऱ्या दुकान चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी मेन रोडवरील पंचरत्न बनियन सेंटर मालकाने शटर बंद करून मागील बाजूने दुकान सुरू ठेवून गिऱ्हाइकी करीत असल्याचे निदर्शनास येताच पथकाने तेथे पोहचून दुकान मालकाला १० हजार रूपयांचा दंड ठोठावला. यापुर्वी सुध्दा या दुकान मालकावर दोन ते तीन वेळा अशाच प्रकारे कारवाया झालेल्या आहेत. मात्र सदर दुकान चालकाकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने यापुढे कठोर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे.

प्रशासनाला सहकार्य करा: ठाणेदार सुनिल अंबुलकर

राज्य शासनाने कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच परवाणगी नसलेल्या दुकान चालकांनी दुकाने उघडून नियमांचे उल्लंघन करू नये. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ठोणदार सुनिल अंबुलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here