Home Breaking News मद्यविक्रीबाबत नेमके आदेश काय?

मद्यविक्रीबाबत नेमके आदेश काय?

 

खामगाव – लॉकडाऊन मध्ये मद्य विक्री बंद असल्याने तळीराम त्रस्त झाले आहेत. दरम्यान अवैध दारू विक्रीला उत आला असून देशी दोनशे तर इंग्रजी तिनशे अशी विक्री होत आहे. मद्य विक्री बाबत नेमके आदेश आहेत तरी काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने 14 एप्रिल पासून पुन्हा 1 मे प्रर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आजपासून या कडक लॉकडाउनला सुरुवात झालेली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत असल्याने आधीच 8 दिवस लॉकडाऊन होते, त्यानंतर आता 15 दिवसाचा लॉकडाऊन सुरू झालेला आहे. याकाळात अवैध दारू विक्री सुद्धा जोमात आहे. देशी विदेशी दारू चढ्या दराने विकली जात असून अनेक ठिकाणी ढाबे व हॉटेलवर नकली दारू विकली जात आहे.

दारू विक्री दुकाने बंद आहेत. बार वरून फूड होम डिलिव्हरी की मद्य व फुड याबाबत स्पस्ट आदेश नाहीत. दरम्यान याबाबत सविस्तर माहिती जाणुन घेतली असता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अद्याप बार मालकांना मद्य विक्री बाबत काही आदेश नसल्याचे समजते.

पार्सल सुविधा सुरू ठेवा!
बार मधून मद्य व जेवण ही पार्सल सेवा सूर ठेवा अशी मागणीही होत आहे. अवैध मार्गाने होणारी दारू विक्री बंद करण्यासाठी ठराविक वेळेतच बार वरून मद्य विक्रीसाठी परवानगी द्यावी अशी मागणीही बार मालक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here