Home Breaking News काँगेस सेवा दलाने केले महामानवाला अभिवादन

काँगेस सेवा दलाने केले महामानवाला अभिवादन

समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटले डॉ. बाबासाहेब आंबेडकर – तेजेंद्रसिंह चौहान

खामगाव : समाजातील वंचित शोषित तसेच सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर झटले, असे उद्गार बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर केले.
14 एप्रिल म्हणजेच विश्ववंदनीय, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शांततेत परंतु मोठ्या हर्शोल्हासीतपणे नियम पाळून साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एड. अविनाश इंगळे, जिल्हा सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष अमित तायडे, सौरभ रिछरिया, दिलीप लांडगे, रईस भाई आकाश पोळके, शुभम मोरे, मनोज कळस्कर, विशाल तराळे, आदित्य लोखंडे, चेतन काकडे, महादेव नाईक आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here