Home Breaking News डोंगरशेवली येथे चोरट्यांचा सुळसुळाट

डोंगरशेवली येथे चोरट्यांचा सुळसुळाट

चिखली :आमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरशेवली गावात अनेक दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट निर्माण झाला असून, गावात चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे.

किन्होला रोडला लागून असलेल्या गणेश सावळे यांच्या घराच्या वट्यावरून काल रात्री हरभऱ्याचे 6 पोते चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना काल मध्य रात्री घडली.

सविस्तर वृत्त असे की, गणेश सावळे हे आपल्या शेतामध्ये गेल्या 4 वर्षांपासून राहतात, शेतीचा संपूर्ण माल हा त्यांच्या घराच्या वट्यावर असतो, हे सर्व हेरून व मध्य रात्रीचा फायदा घेऊन चोरट्यांनी 6 हरभऱ्याचे पोते म्हणजे जवळ जवळ 50 हजार रुपयांचा माल चोरून नेला.

परिसरातील ही तिसरी घटना असून 4 दिवसापूर्वी एका शेतकऱ्याची म्हैस चोरून नेण्याचा प्रयत्न देखील झाला होता. या परिसरात वारंवार अश्या चोरीच्या घटना घटत आहे. या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा असा सूर गावकरी वर्गातून निघत आहे. आता यावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते हे बघावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here