Home Breaking News लॉकडाऊन मध्ये विक्रीसाठी जाणारी अवैध दारू जप्त

लॉकडाऊन मध्ये विक्रीसाठी जाणारी अवैध दारू जप्त

अवैद्य दारू विरोधात जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई, 278320 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

जळगाव जा : पोउपनि प्रल्हाद मदन यांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिहाली की. कुहा काकोडा गावाकडून एका महीदा हेरिटो कंपनीची गाड़ी अवैदय विदेशी दारू घेवुन आडोळ मार्गे नांदुरा येथे जाणार आहे अशी खबर मिळाल्याने पोउपनि प्रल्हाद मदन यांनी मा, पोलीस निरीक्षक साहेब यांना माहीती देवुन त्यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे नेमणुक केलेल्या पथकातील पोलीस नाईक गणेश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपुत यांना सोबत घेवुन दादुलगांव नवे येथे सदर गाडी पकडली असता त्यामध्ये नांदुरा येथील मधुकर तुकाराम घन हा व्यक्ती मिळुन आला त्याचे गाडीची झाडती घेतली असता सदर गाडीच्या डिक्की मध्ये officer’s choice BLUE कंपनीचा एक बॉक्स व Mc Dowell’s No 1 या कंपनीच्या 3 बॉक्स असा एकुण 28320 /- रूपये व गाडी पांढऱ्या रंगाची महींद्रा व्हेरीटो कंपनीची कमांक एम.एच 28 व्ही 4159 किंमती 250000/- रूपये असा एकुण 278320 रूपयाचा मुददेमाल मिळुन आला.

सदर कार्यवाही हि मा. पोलीस अधीक्षक साहेब बुलडाणा, मा. अपर पोलीस अधीक्षक साहेब खामगांव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, मलकापुर यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. सुनिल जाधव यांचे आदेशा नुसार व सुचनांप्रमाणे पोउपनि प्रल्हाद मदन, पोलीस नाईक गणेश पाटील व सचिन राजपुत यांनी केली. सदर पथकाची या आठवडयामध्ये तिसरी माठी कार्यवाही झाल्याने चोरून लपुन अवैदय व्यवसाय करणारांचे धाबे दणानले आहे. यापुढे असे चोरून लपुन सुध्दा व्यवसाय करणारांवर कडक कार्यवाही करून त्यांचे विरूध्द तडीपारीची कार्यवाही करणार असल्याने पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here