Home Breaking News ‘शिवराज’ फार्महाऊसवर सट्टा बाजार; पोलिसांचा छापा

‘शिवराज’ फार्महाऊसवर सट्टा बाजार; पोलिसांचा छापा

आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा १ लाख ५४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक; लासुरा शिवारातील घटना

शेगाव: सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट वर सट्टा खेळणाऱ्या खामगाव येथील तिघांना लासुरा शिवारात  शिवराज फार्म हाऊस येथून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने छापा मारून अटक केली यावेळी पोलिसांनी एक लाख 54 हजार 965 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत शेगाव ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव खामगाव रोड वरील लासुरा शिवारात शिवराज फॉर्म या ठिकाणी इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट सामन्यावर पैशाच्या हारजित वर सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या  पथकाने  शेगाव खामगाव रोड वरील लासुरा शिवारात असलेल्या युवराज फार्म हाऊस येथे मंगळवारी १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ते ११:४५ यादरम्यान छापामार कारवाई केली यावेळी आकाश धनंजय शेळके राहणार सनी पॅलेस जवळ खामगाव गणेश मनोहर गोरे वय 28 वर्षे राहणार मोठी देवी जवळ जलालपुरा खामगाव विशाल राजेश बोबडे 36 वर्षे राहणार बोबडे कॉलनी खामगाव हे तिघे जण मोबाईल लॅपटॉप व इतर साहित्याच्या सहाय्याने क्रिकेट सट्टा नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना  मिळून आले यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून नगदी चार हजार दहा रुपये एक लॅपटॉप तेरा नग मोबाईल हँडसेट एकएलईडी टीव्ही सेट अप बॉक्स जुने दोन रिमोट मोबाईल चार्जर जुनी बॅग कॅल्क्युलेटर असा एकूण एक लाख 54 हजार 965 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बुधवारी मध्यरात्री ३ वाजून १३ मिनिटांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दिलीप राव बोरसे फौजदार अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय खामगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी करीत आहेत या छापामार कारवाईमुळे शेगाव खामगाव परिसरात खळबळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here