Home जागर सावधान, ते कमळाचे रोप नाही..तर धोकादायक जलपर्णी!

सावधान, ते कमळाचे रोप नाही..तर धोकादायक जलपर्णी!

सिद्धांत उंबरकार
खामगाव – 
कमळाचे कंद असल्याचे सांगून धोकादायक जलपर्णीची विक्री केल्या जात असल्याचा प्रकार शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काही महिला शहरातील प्रमुख रस्त्यांवर फिरून विविध रंगांच्या फुलांचे रंगबिरंगी फोटो दाखवून नागरिकांना आकर्षीत करत  या कंदाची विक्री करीत आहेत. यामुळे नागरिकांची फसवणूक होत असून   जलपर्णीच्या कलमा जागोजागी पडून राहत असल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
कमळ फुल सर्वांचेच आवडते आहे. त्यामुळे नागरिक कमळाचे कलम खरेदी करीत असतात. शहरात गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर, मलकापूर कडील काही महिला शहरातील रस्त्यांवर फिरून टोपल्यांमध्ये झाडांचे कंद घेवून फिरत आहेत. नागरिकांना सदर कंद ह्या कमळ, ट्युलिपचे असल्याचे भासवून व विविध रंगांच्या फुलांचे रंगबिरंगी फोटो दाखवून नागरिकांना आकर्षीत करत विक्री केल्या जात आहे. मात्र या कलमांना कोणतेही फुल येत नाही नंतर नागरिकांना काही दिवसात सदर कलम कमळाचे नसून जलपर्णीचे लक्षात येते. आपली फसवणूक झाल्याचे  दिसून येताच नागरिक सदर कलम नाली, रस्ते, नदीमध्ये फेकून देतात. मात्र पर्यावरणाला घात अशा जलपर्णीचे कलम जागोजागी पडून राहत असल्यामुळे जलपर्णीचे मोठ मोठे वेल येवून संपुर्ण परिसरसाला जलपर्णीचा वेढा पडण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी दुषित होत  व जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो व लोकांना प्रदूषण झाल्याचे लक्षात येते. हे भयंकर असून अशा प्रकारापासून नागरिकांनी सावधना राहण्याची गरज आहे. नागरिकांनी सावधान राहून सदर कंद हे कुठेही न फेकता त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
मागील वर्षी अशाच प्रकारे जलपर्णीने अकोला येथील नदी पुर्ण झाकून गेली होती. त्यामुळे पाणी दुषित झाले होते व तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेवून या जलपर्णी  काढल्या होत्या. त्याला आंदोलनाचे देखील मोठे स्वरूप आले होते. अशा या धोकादायक जलपर्णीच्या फैलावापासून सावध राहण्याची गरज आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून काही महिला कमळाचे कलम असल्याचे सांगून जलपर्णीच्या कंदाची विक्री करीत आहेत. नागरिक सदर कलम खरेदी करतात मात्र काही दिवसानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. नंतर सदर कलम नदी, नाल्यांमध्ये फेकतात. मात्र ते घातक असून त्याचे गाजरगवताप्रमाणे निर्मुलन करणे गरजेचे आहे. कारण  गाजर गवत हे जमीन खराब करते तर ही जलपर्णी पाणी खराब करते. त्यात असणाऱ्या जलचरणा प्राण्यांसाठी त्रासदायक आहेत. तेव्हा नागरिकांनी ही वनस्पती घेवू नये व घेतलीच तर ती इतरत्र कोठेही न टाकता त्याची जागीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
जितेंद्र कुयरे, खामगाव

(आ. आकाश फुंडकर यांचे स्वीय सहायक) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here