Home संग्रामपूर परिसर सलग दोन आत्महत्यांनी समाजमन सुन्न

सलग दोन आत्महत्यांनी समाजमन सुन्न

 

संग्रामपूरःगत दोन दिवसात दोन आत्महत्यांमुळे संग्रामपूर तालुक्यातील टूनकी ग्राम हादरले आहे. शुक्रवारी मध्यरात्री टूनकी खुर्द तर शनिवारी रात्री टूनकी बु. येथे आत्महत्येच्या घटना उघडकीस आले आहेत. टूनकी बु. येथील एका विवाहित २३ वर्षीय महिलेने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. हि घटना शनिवारी रात्री ११:४५ वा.च्या दरम्यान उघडकीस आली. येथील फरीदाबी शेख इरफान या २३ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रविवारी सकाळी महिलेच्या पतीने सोनाळा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, शनिवारी रात्री घरातील पलंगावर ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत पत्नी आढळून आली. तिला तातडीने उपचारासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. पतीच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर महिलेचे पार्थिव माहेरच्या नातेवाईकांनी ताब्यात घेऊन अकोला जिल्ह्यातील अडगाव येथे नेले. तेथेच दफन विधी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून याबाबत सोनाळा पोलीसांनी तपास सूरू केला आहे. सलग दोन दिवसात दोन आत्महत्यांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. एक दिवस अगोदर शुक्रवारी मध्यरात्री टूनकी खुर्द येथील एका अविवाहित २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर दुसऱ्या दिवशी टूनकी बु. येथील विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने टूनकी गाव हादरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here