Home Breaking News लॉक डाऊन मध्ये दारू विक्री करणाऱ्याला खाकीचा हिसका

लॉक डाऊन मध्ये दारू विक्री करणाऱ्याला खाकीचा हिसका

जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ची अवैध देशी दारू वाहतूकदारांवर धडाकेबाज कारवाई

जळगाव जामोद पोलीस स्टेशन ने पुन्हा एकदा अवैधरित्या देशी वाहतूक करणाऱ्या विरोधात केली. १० एप्रिल च्या संध्याकाळी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की आसलगाव येथे दोन व्यक्ती मोटरसायकलवर अवैध रित्या देशी दारू घेऊन येतात व बाजारामध्ये थांबून देशी दारुची विक्री करतात अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांना माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे पोलीस नाईक गणेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांना सोबत घेऊन आसलगाव येथे जाऊन मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहन वानखडे यांचे घराकडे पायी जात असताना त्यांच्या घराचे शेरीमधून एका मोटरसायकलवर मोहन वानखडे व सुरेंद्र मेहंगे असे दोन जण दारू घेऊन येताना दिसले त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भरधाव गाडी चालवून ते गाडीवरून पडुन त्यांनी देशी दारुचा माल जागेवरच सोडून गाडी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला नंतर पोलिसांनी सदर देशी दारुचा माल ताब्यात घेतला व मोहन वानखडे यांच्या कुटाराच्या गोठ्याची पाहणी केली असता तेथे त्यांना देशी दारू संत्रा ५००० कंपनीचे १० बॉक्स व गाडी वरून पडलेला एक बॉक्स असे एकूण ११ बॉक्स देशी दारू चा माल किंमत २८ हजार ८८५ रुपयाचा माल मिळून आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत उपविभागीय पोलिस अधिकारी तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचे सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पीएसआय सचिन वाकडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here