Home Breaking News नांदुऱ्याच्या तरुणावर हनी ट्रॅप; अश्लील व्हिडिओ वायरल करण्याची धमकी

नांदुऱ्याच्या तरुणावर हनी ट्रॅप; अश्लील व्हिडिओ वायरल करण्याची धमकी


नांदुरा –
  आपल्या सर्वांच्या हाती असलेल्या मोबाईल मुळे डिजीटल  इंडिया चे माध्यमातुन संवादा पासुन ते थेट रूपये पैशाचे आर्थिक देवानघेवान सुध्दा सुलभ झाल्यामुळे  आरामदायी  जिवनात स्वर्ग जणुकाही ४ बोटे दुर असल्याचा भास निर्माण होत होता. अशातचं कुणाची दृष्ट लागली कळत नाही. गेल्या महिण्यापासुन आपल्या बॅंक खात्याशी आधारकार्ड, पॅनकार्ड,एटीएम कार्ड लिंक करण्याचे शासकिय धोरणाचे सर्वानां अनुकरण करावे लागलेले आहे.त्यामुळे अनेकांना सायबर क्राईम करणार्‍यांनी बॅंकेतुन बोलण्याची विविध कारणे सांगुन नवनविन युक्त्या वापरून सामान्य नागरीकांपासुन ते सुशिक्षीतांचे बॅंक खात्यातुन लाखोरूपयांची रक्कम पळविण्याची अनेक प्रकरणे आपण विविध वृत्तपत्रातुन वाचत असतो.
आता हे फसवणुकिचे प्रकार कमी झाले कि काय म्हणुन आर्थिक फसवणुकिचे नवनविन फंडे ऊघडकिस येत आहेत.याकामी  तरूणींचे सहाय्याने ‘हनी ट्रॅप’ करत व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आर्थिक फसवणुक करण्याचे लोण आता थेट अनेक जिल्हात घोंगावत आहे. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्यातील नांदुरा शहरात ऊघडकिस आल्यामुळे प्रारंभी घाबरून गेल्यामुळे एका युवकाने मित्रांचे सल्याने थेट नांदुरा पोलिस स्टेशन गाठले. पोलिस प्रशासनाने सदर युवकाचा ब्रेन वाॅश करून त्याची रितसर तक्रार नोंदवून घेत आर्थिक फसवणुकी पासुन तर वाचविलेच पण त्याचे घाबरलेल्या जिवाचे मनोधैर्य वाढविले.
याबाबत अधिक वृत्त असे कि, शहरातील एका सुशिक्षीत  कुटुंबातील निशान  (काल्पनीक नाव) ३५ वर्षीय युवकास दि.७ एप्रिल २०२१  रोजी सकाळी ११ वाजता ९७०७४६८२३३ या मोबाईक क्रमांकावरून वाॅटसप व्हिडिओ काॅल आल्यावर तो रिसीव्ह केला असता एक अनोळखी महिला हिंदी भाषेत बोलतांना दिसुन आली ,,तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौण ?,, असे म्हणत असतांना तिने आपल्या अंगावरील कपडे काढले होते. सदर गैरप्रकार दिसुन येताच गांगरून गेलेल्या त्या युवकाने लगेच आपला मोबाईल बंद केला होता. सदर प्रकारा नंतर लगेच त्याच वरील मोबाईल क्रमांकावरून एका पुरूषाने धमकविण्याचे आवाजात काॅल करून बोलला कि, तुम्हारा हमने व्हिडिओ बनाया है ! तुम मेरे अकाऊंट नंबर ७८७३९७४७४०७५ (+IFC  कोड) पर ५००० रूपये भेज दो !! पैसे नही दिये तो मै तुम्हारा व्हिडिओ सोशल मिडिया पर व्हायरल कर दुॅंगा और तुम्हारी बदनामी कर दुंगा अशी धमकी दिली. यानंतर पुन्हा दोन, तीन वेळा काॅल करून पैसे डालता के नही ! असे म्हणुन शिविगाळ करून धमकी दिलेली आहे.
या प्रकरणी युवकाच्या  तक्रारीवरून  नांदुरा पोलिसांनी    कलम ५०४,५०६,५०७ भादंवी अन्वये गुन्हे   दाखल करून पुढील तपास  पोलिस निरीक्षक  यांचे मार्गदर्शनात पोलिस ऊपनिरीक्षक दौड साहेब तपास करीत आहेत. अशा प्रकारची घटना कुणासोबतही घडल्यास घाबरून न जाता आपली आर्थिक फसवणुक न होऊ देता पोस्टे ला तक्रार करावी. जेनेकरून अशा प्रकारचे  सायबर अपराध करणार्‍या रॅकेटचा बिमोड करता येईल  असे आवाहन नांदुरा पो स्टे चे पोलीस निरीक्षक  सुरेश नाईकनवरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here