Home प्रेरणदायी रेखाताई खेडेकरांवर आधारित ‘जनरेखा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन सोमवारी

रेखाताई खेडेकरांवर आधारित ‘जनरेखा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन सोमवारी

बुलडाणा : चिखली मतदार संघाच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांची 12 एप्रिल रोजी एकसष्ठी आहे. हिरकमहोत्सव निमित्ताने त्यांच्या सर्वव्यापी कारकिर्दीवर जनरेखा गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. या गौरवग्रंथात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काही मान्यवरांचे शुभेच्छासंदेशही प्रकाशित करण्यात आले आहेत. या गौरवग्रंथाचे प्रकाशन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होत असून, या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव आहेत. हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार श्वेताताई महाले, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार, चिखलीच्या नगराध्यक्ष प्रियाताई बोंद्रे, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, माजी आमदार बाबुराव पाटील, माजी आमदार भारतभाऊ बोंद्रे, माजी राहुल बोंद्रे राहणार आहेत.
जनरेखा हा गौरवग्रंथ चारशे पानांचा असून, त्याची किंमत केवळ 150 रुपये ठेवण्यात आली आहे. रेखाताई खेडेकर यांची 15 वर्षांची आमदारकी, त्यांचे मराठा सेवा संघात योगदान, कुटूंब आणि नातेवाईक यांच्या सुखदु:खात पार पाडलेली जबाबदारी, एक सुसंस्कृत व खंबीर पत्नी म्हणून ॲड. पुरुषोत्तम खेडेकरांना दिलेली खंबीर साथ या व इतर बाबतीतली सर्व माहिती जनरेखा या गौरवग्रंथात वाचायला मिळणार असल्याने वाचकांसाठी ही महापर्वणीच ठरणार आहे. गौरवग्रंथ आणि उपरोक्त कार्यक्रमासाठी पांडुरंग खेडेकर, पंडीतराव देशमुख, सौरभ खेडेकर, कपिल खेडेकर, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेकजण मेहनत घेतली आहे.

फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचा लाभ घ्या !
जनरेखा गौरवग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे सर्वांना पाहता-ऐकता येणार आहे. त्यामुळे चिखली येथे प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाईन कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनोद बोरे यांच्यासह रेखाताई खेडेकर एकसष्ठी सत्कार व गौरवग्रंथ प्रकाशन समितीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here