Home क्राईम खामगाव पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा

खामगाव पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा

 

खामगांव: राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला खामगाव शहर पोलिसांनी आज पकडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की ऑटो क्रमांक एम एच-२८- टी-३०४१ मध्ये अवैधरित्या गुटखा वाहतुक येथून घेऊन जाणार आहे. यावरून शहर पोलिसांनी निर्मल टर्निंग येथे नाकाबंदी केली असता सकाळी ६:३० वाजता च्या सुमारास सदर ऑटो टिळक पुतळ्याकडून पोलिसांना येताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्या ऑटोला थांबवले असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधी केसर युक्त विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू असा १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल व ऑटो मोबाईल व इतर साहित्य असा एकूण २ लाख हजार रुपयांचा मद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असतांना पोलिसांनी यामध्ये आरोपी मोहम्मद अब्रार मोहम्मद सबदर वय ३२ राहणार बर्ड प्लॉट खामगाव मोहम्मद अख्तर शेख अयुब व ५१ राहणार जुना फैल खामगाव अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १८८, २६९, २७०, २७२, २७३ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंहह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक गौरव सराग. राजेंद्र टेकाळे, सुरज राठोड ,अमर ठाकूर, प्रफुल्ल टेकाळे, जितेश हिवाळे यांनी केली आहे. कालच जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्त चंद्रशेखर मीना हे भेट देऊन गेले होते त्यानंतरची ही जिल्ह्यातली सर्वात मोठी कारवाई आहे. यामुळे अवैध धंदे करणाऱ्याना पोलिसांचा वचक बसला आहे असे म्हटले तरी हरकत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here