Home Breaking News दस्त नोंदणीकरीता कोविडचा निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य

दस्त नोंदणीकरीता कोविडचा निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य

 

बुलडाणा : सहजिल्हा निबंधक वर्ग 1 बुलडाणा व अधिनस्थ एकूण प्रत्येक तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणारे पक्षकारांची संख्या विचारात घेता गर्दी जास्त प्रमाणात होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्याने व जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने दुय्यतम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणाऱ्या पक्षकार यांचेकडे कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य आहे. सदर रिपोर्ट पक्षकार उपलब्ध करून देणार नसतील, अशा पक्षकारांना कार्यालयात प्रवेश मनाई राहील. सदरची कार्यवाही 12 एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे. तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी कोविड 19 चा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल आणावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.

सहजिल्हा निबंधक कार्यालयाचे आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दुय्यक निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करीता येणाऱ्या पक्षकारांची संख्या विचारात घेता कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांनी दक्षता घ्यावी. नागरीकांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येण्यापूर्वी आपली दस्त नोंदणीची वेळ आरक्षीत करून घ्यावी. आरक्षीत वेळेलाच दस्त नोंदणीसाठी यावे, प्रथमत : केवळ दस्त सादर करणाऱ्या एका पक्षकारास व वकीलास (असल्यास) कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. दस्त छाननी, सादरीकरण शिक्का 1 व 2 पुर्ण झाल्यावरच इतर पक्षकारांना दस्तात नमूद नावानुसार क्रमवारी प्रवेश दिला जाईल. पक्षकारांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात आल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात ठरवून दिलेल्या अंतरावरच उभे रहावे, तसेच कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी तोंडाला मास्क, हात सॅनिटायझरने स्वच्छ करून नंतरच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. दस्तावर सह्या करण्यासाठी दस्तातील प्रत्येक पक्षकाराने स्वत:चा पेन सोबत आणावा. एकमेकांचा पेन वापरू नये, नोटीस ऑफ इटिमेंशन फिजीकल फायलिंग सद्यस्थितीत बंद करण्यात आले असून ई फायलिंगचा वर्जन 1 व वर्जन 2 चा पर्याय उपलब्ध आहे. तरी त्याचा वापर करण्यात यावा. दस्त नोंदणी झाल्यानंतर लगेच कार्यालयाच्या बाहेर पडावे, विनाकारण कार्यालयाच्या आवारात गर्दी करू नये. तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here