Home मलकापूर नको ती घटना घडली आणि सेवानिवृत्त शिक्षकाने जीवनच संपविले

नको ती घटना घडली आणि सेवानिवृत्त शिक्षकाने जीवनच संपविले

मलकापूर :-तालुक्यातील ग्राम म्हैसवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षकास त्याचे घरासमोरील युवकाने घरात घुसून काठीने मारहाण केली अपमान असह्य झाल्याने त्या पंचाहत्तर वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दि.04 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेपुर्वी घडली आहे.पंचनाम्यादरम्यान मृतकाच्या पैजाम्याच्या नाड्यात एक चिठ्ठी सापडली असल्याची माहिती दसरखेड ग्रामीण पोलीसांनी दिली आहे.
        याबाबतची तक्रार मृतकाचा मुलगा नितीन सोपान धाडे रा.म्हैसवाडी यांनी दसरखेड ग्रामीण पो.स्टे ला दिली असून तक्रारीत नमूद केले आहे की ग्राम रिगांव ता.मुक्ताईनगर येथील लहान बहिणीच्या घराचे बांधकाम वडील सोपान रुपचंद धाडे यांनी  म्हैसवाडीतील संजय नारायण खवले याच्या मध्यस्थीने दुसऱ्या इसमास सत्तर हजार रुपयात ठरविले होते, बांधकाम करणाऱ्याने बांधकामापोटी चाळीस हजार रुपयाची उचल करून पाहिजे त्या प्रमाणात बांधकाम केले नसल्याने सोपान धाडे यांनी मध्यस्थी असलेल्या संजय खवले यास म्हटले असता संजय खवले ग्रामस्थांसमोर धाडे यांच्या अंगावर धावून गेला व त्यांच्याच हातातील काठी घेऊन गावकऱ्यांसमोरच वडीलांना जबर मारहाण केली या मारहाणीमुळे अपमान असह्य झाल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीवरून पोलिसांनी संजय नारायण खवले विरुद्ध कलम 306 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे ,मृतकाच्या पायजाम्याच्या नाड्यात सापडलेल्या चिठ्ठीत मारहाणीचा सारा वृत्तांत सोपान धाडे यांनी लिहुन ठेवला असुन संजय नारायण खवले हाच मृत्युस जबाबदार असल्याने पोलिसांनी त्यास अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मिर्झा करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here