Home खामगाव कोरोना अपडेट आता खामगाव हॉस्पिटलमध्ये ‘100 ऑक्सिजन बेड’

आता खामगाव हॉस्पिटलमध्ये ‘100 ऑक्सिजन बेड’

खामगाव : कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य खामगाव शहरातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज ओळखून खामगाव सामान्य रुग्णालयात आणखी दोन वार्डचे काम अंतिम टप्प्यात असून आता १०० ऑक्सिजन युक्त बेड रुग्ण सेवेत उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑक्सिजन बेडयुक्त आयसोलेशन वार्ड व आवश्यक सर्व सुविधा आवश्यक असून त्यासाठी ५ लक्ष निधी आमदार ऍड. आकाश फुंडकर यांनी दिला होता. या निधीतून नवीन वार्डचे काम करण्यात आलेले आहे. यासाठी सामन्य रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी पुढाकार घेतला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सामन्य रुग्णालयात घाटाखालील सहा तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथील कोविड हॉस्पिटल मध्ये बेड शिल्लक नसतात. आणखी वाढीव ऑक्झिजन बेडचे कोविड कक्ष व विविध सुविधा आवश्यक आहेत, त्यासाठी ५ लाखांचा निधी आमदार ऍड. आकाश फुंडकर यांनी दिला. तर डॉ. निलेश टापरे यांनी यासाठी पुढाकार घेत नवीन 2 वार्ड सुरू केले आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते बिपिन गांधी यांनी सुद्धा सहकार्य केले. तातडीने रुग्णसेवासुविधा सुरू केल्याबद्दल रुग्ण समिती राम मिश्रा,संजय शिनगारे यांनी आधार व्यक्त केले.

खामगाव सामान्य रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्ण जास्त दाखल होतात. त्यांना आमची टीम चांगली सेवा देते. रुग्ण कोरोनावर मात करून बरे होत आहेत. आता रुग्ण वाढत असल्याने १०० बेड ऑक्सिजन सुविधेसह तयार करण्यात आले आहेत. रुग्णांनी टेस्ट, उपचार व लसीकरण यासोबतच नियम पाळणे गरजेचे आहे.
– डॉ. निलेश टापरे
वैद्यकीय अधिकारी, सामन्य रुग्णालय
खामगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here