Home धर्म जागरण सातपुड्यातील ऋषि महाराज संस्थानचे पिठाधीश कृष्णानंद भारती महाराज

सातपुड्यातील ऋषि महाराज संस्थानचे पिठाधीश कृष्णानंद भारती महाराज

संग्रामपूर (प्रतिनिधी) ः पुरातन काळापासुन सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ऋषि महाराज संस्थान श्री पंच दशनाम जुना आखाडाचे श्री 108 महंत श्रावण भारती महाराज (109) यांचे 16 मार्च रोजी महापरिनिर्वाण होऊन पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या जागी पिठाधीश म्हणून कुष्ण नंद भारती महाराज यांना नियुक्त करण्यात आले आहे.
श्रावण भारती महाराज यांचे 16 मार्च रोजी महापरिनिर्वाण झाल्यानंतर 17 मार्च रोजी सवामी कृष्णानंद भारती महाराज वारी हनुमान यांनी विधीवत पुजा अर्चा करून ब्रम्ह मुहुर्तावर त्यांना गुफेत समाधी दिली. यावेळी संत, महंत व सर्व भावी भक्त उपस्थित होते. आखाड्याच्या परंपरेनुसार 16 दिवसानंतर षोडशी भंडारा कार्यक्रम पार पडला. तसेच उत्तराधिकारी नियुक्त करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. यानंतर 31 मार्च रोजी स्वामी क़ुष्ण नंद भारती महाराज यांची पिठाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्व विधी पुर्ण करण्यात आल्या. स्वामी रामभारती महाराज यांच्या नियुक्तीचे महंत महेंद्रभारती महाराज वडगाव, स्वामी कृष्णानंद भारती, स्वामी महंत मधवानंद गिरी,  महंत गजानन भारती, महंत प्रयाग भारती, महंत सदानंद भारती तसेच सुरेश अग्रवाल, सारंगधर गावंडे, गजानन काळे, अभिषेक वडोदे, संजु गावंडे, राजु दाभाडे, प्रामेद, सोनाजी, शंकर, गजानन, अंकुश, गोविंदा आदी भक्तांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here