Home राजकारण प्रवीण क्षिरसागर पाटील यांचा समर्थकांसह कांग्रेसमध्ये प्रवेश

प्रवीण क्षिरसागर पाटील यांचा समर्थकांसह कांग्रेसमध्ये प्रवेश

मलकापूर- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक बुलढाणा जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे, तालुका अध्यक्ष बंडूभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात मलकापूर तालुका काँग्रेसमध्ये प्रविण क्षिरसागर यांनी कार्यकर्त्यांसह रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश घेतला. प्रविण क्षिरसागर हे तालुक्यातील एक उमदे, कर्तुत्ववान, दबंग व कार्यतत्पर नेतृत्व मलकापूर काँग्रेसला मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या प्रवेशाने तालुका काँग्रेसला एक भक्कम बळ मिळाले असे आमदार राजेश एकडे यांनी प्रवेशाच्या वेळी सांगितले. यावेळी गणेश नारखेडे, दीपक नारखेडे, संजय गोरे ,रामधन क्षिरसागर,रवी क्षिरसागर, परमेश्वर क्षिरसागर, प्रवीण क्षिरसागर, श्रीकृष्ण क्षिरसागर, नारायण भानुदास क्षिरसागर,उद्धव ठाकरे, सचिन तायडे, मंगलसिंग चव्हाण, किशोर आमले, विजय गोरे, प्रवीण व्यवहारे, ज्ञानेश्वर बागल, भाऊराव व्यवहारे, अमृत संबारे, सुनील संबारे, दिगंबर संबारे, महेंद्र संबारे, गोविंदा इंगळे ,यशवंत क्षिरसागर, राहुल संबारे, रोहित संबारे, विनोद संबारे, ज्ञानेश्वर संबारे,, गोपाळ उमाळे,प्रभाकर मालठाणे, किशोर मालठाणे, विजय मालठाणे, विजय सपकाळ, रविंद्र मालठाणे, अनंता गायकवाड,उमेश सुलताने उज्वला पाटील, पद्मिनी नारखेडे, बादल पाटील, तेजराव वनारे,दादाराव वनारे, श्रीकृष्ण वनारे, जगदीश वनारे, सतिष वनारे, वैभव वनारे,संजय जवरे, अमोल चव्हाण, तेजस रायपुरे,माणिकराव वनारे, नामदेव इंगळे, गजानन गव्हाळे, सुमेरसिंह राजपूत, विजुभाऊ वाघमारे, अरुण त्र्यंबक इंगळे, विजय भवरे, दीपक तायडे इतर तमाम कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करुन मलकापुर तालुका कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

“प्रविण क्षिरसागर हे तालुक्यातील एक उमदे, कर्तुत्ववान, दबंग व कार्यतत्पर नेतृत्व मलकापूर काँग्रेसला मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या प्रवेशाने तालुका काँग्रेसला एक भक्कम बळ मिळाले”
– आ. राजेश एकडे, मलकापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here