Home विदर्भ कुणबी समाजावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : कुुुणबी युवा मंच

कुणबी समाजावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : कुुुणबी युवा मंच

युवकांचे संघटन काळाची गरज – प्रा.डॉ. अनिल अंमलकार
खामगाव –
कुुुणबी युवा मंच खामगाव तालुका शाखा यांच्या वतीने दि. ४ एप्रिल रोजी चांदमारी भागातील आयटीआय कॉलेज येथे कुणबी समाज युवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम जगद्गुरु संत तुकोबाराय, राष्ट्रमाता राजमाता मॉ जिजाऊ यांचे प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरूवात करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य जेष्ठ समाज नेते शांताराम पाटखेड़े तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. अनिल अमलकर, कैलास फाटे, रवि महाले, सुभाष फेरन व प्रमुख उपस्कुथिती कुणबी युवा मंच जिल्हाअध्यक्ष शिवराज महाले, तालुका अध्यक्ष मुकेश गावंडे, सरदार उपस्थित होते. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना समाजापुढील समस्या, युवकांचे प्रश्न, आर्थिक शैक्षणिक सामाजिक बाबतीत प्रकाश टाकण्यात आला.  लहान सहान समाजांचे संघटन असून दबाव गट आहेत परन्तु सर्वात मोठा समाज असूनही आपल्या युवकांचे संघटन जसे पाहिजे तसे नाही. त्यामुळे युवकांचे सामाजिक संघटन ही काळाची गरज असल्याचे डॉ.अनिल अंमलकार म्हणाले. तर कैलास फाटे यानी इंगळे परिवारावर जो हल्ला झाला असे अन्याय समाज सहन करणार नसून याबाबत पुढील काळात आपली भूमिका काय असली पाहिजे यावर मार्गदर्शन केले. रवि महाले यानी संघटन बांधनी कशी मजबूत करण्यात येईल याबाबत स्पष्ट केले. शिवराज महाले, मुकेश गावंडे यांनी आणि आलेल्या युवकानी आपापली मते मांडली आणि कुणबी समाजातील अड़ीअडचणी एकजुटिने सोडवू, समाजातील कोणावरही अन्याय झाल्यास समाज त्याच्या पाठीशी खंबीरपने उभा राहिल असा संकल्प करण्यात आला.  कार्यक्रम यशस्वितेसाठी अनिल खोडके, सुरज बेलोकार, पुरुषोत्तम मेतकर, प्रतिक लोखंडकार, कविश्वर टेरे, केशव दुतोंडे,  कैलास भारसाकळे, सुभाष फेरण, चेतन महाले, गणेश मारवाडी, महेश राऊत, अरूण मांजरे, गुलाबराव निंबाळकर, प्रफुल हांडके, मोहन पुदाके, योगेश आळशी, गजानन खरप, प्रविण टिकार, नारायण फाळके, गोपाल दांदळे, चतन महाले, नारायण बोडे, ज्ञानेश्वर दबडघाव आदींनी परिश्रम घेतले. तसेच बैठकीचे सूत्र संचालन मुकेश गावंडे तर आभार प्रदर्शन अनंता शेळके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here