Home Breaking News लग्नाचा बस्ता बांधून परतणाऱ्या वाहनाचा अपघात,बाप लेकीचा मृत्यू

लग्नाचा बस्ता बांधून परतणाऱ्या वाहनाचा अपघात,बाप लेकीचा मृत्यू

बुलडाणा : डोणगांव पासून जवळच असलेल्या वाशीम जिल्हातील ग्राम पिंप्री सरहद्द जवळ २७ मार्चच्या रात्री १०:३० वाजता दरम्यान दोन वाहनांच्या अपघातात ग्राम शेंदुर्जन येथील बाप लेकीचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
बुलढाणा जिल्हातील लोणार तालुक्यातील खळेगाव येथील वायाळ परिवार मधील वर तर शेंदुर्जन येथील शिंगणे परिवारातील वधू यांचे लग्न ठरले होते तेव्हा लग्नाचा बस्ता बांधण्या साठी हे परिवार अमरावती येथे गेले बस्ता बांधून परत येत असताना वाशीम जिल्ह्याच्या ग्राम पिंप्री सरहद्द जवळ मेहकर कडून येणारा भरधाव कंटेनर एम एच ०४ इ व्ही ६४८९ ने अमरावती कडून येणाऱ्या एम एच ११ पी डब्लू ०४३६ ला धडक दिली या धडकेत इर्टिका मधील चालक सहित ४ जण गंभीर जखमी झाले तर डॉ दिनकर एकनाथ शिंगणे वय ४७ व त्यांची मुलगी कु कल्याणी दिनकर शिंगणे वय १९ वर्ष यांचा मृत्यू झाला जखमींना डोणगांव येथील खाजगी दवाखान्यात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते लग्नाची धामधूम सुरू असतानाच नवरीचे काका व चुलत बहिणीवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे वधू व वर कडील दोन्ही परिवार डोणगांव येथील नातेवाईक असल्याने अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी लवकरच बचावकार्य करणाऱ्यांची गर्दी जमली होती .
इर्टिका गाडी वरील चालकाच्या प्रसंगावधनाने वाहना मधील इतरांचे प्राण वाचले चालकाने वाहन रस्त्याच्या खाली जावू दिले नाही या अपघाताची माहिती मिळताच डोणगांव येथील निलेश पळसकर,सभापती राजेंद्र पळसकर,विकास पळसकर,विशाल पळसकर,संजय पळसकर आदींनी घटनास्थळी जाऊन मदत केली तर अपघाताची माहिती मिळताच डोणगांव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजार झाले व त्यांनी सुद्धा गाडीतून लोकांना बाहेर काढणे आंबूलन्स बोलावून मदत कार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here