Home अपघात अपघातानंतर चालक दोन तास कॅबिनमध्ये अडकून..!

अपघातानंतर चालक दोन तास कॅबिनमध्ये अडकून..!

शेगाव – अकोट राज्यमार्गावर अपघात : २ गंभीर
चालक 2 तास कॅबिन मध्ये अडकून
आयशर आणि टाटा 407 यामध्ये धडक

शेगाव : (प्रतिनिधी) दि २७ शेगाव वरून अकोट कडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर आज दुपारी आयशर मिनी ट्रक आणि कापसाने भरलेल्या 407 या वाहनांमध्ये अपघात घडला. या अपघातामध्ये दोन्ही वाहनाचे चालक एक गंभीर जखमी झाले असून दोघांना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे. जखमींपैकी एक चालक दोन्ही वाहनांच्या मध्ये दोन तास अडकून पडला होता. यावेळी पोलीस व नागरिकांनी इतर वाहनांच्या मदतीने गंभीर जखमी असलेल्या चालकाला केबिन मधून काढले.
अकोट वरून शेगाव च्या दिशेने जाणाऱ्या एमएच 19 झेड 9413 आयशर कंपनीचा मिनी ट्रकने शेगाव कडेच जाणाऱ्या कापसाने भरलेला 407 वाहन क्रमांक एम एच 04 सीजी 4509 ला ओव्हरटेक करीत असताना मागून धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहने समोरा समोर धडकली या अपघातात 407 वाहन रस्त्यावर उलटले असून आयशर मिनी ट्रक चा चालक केबिनमध्ये अडकून पडला. पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी शर्तीच्या प्रयत्नांती दोन तासानंतर या वाहन चालकाला काढण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here