Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट नवीन वर्षात जिल्ह्यात दिवसाला एक कोरोना मृत्यू

नवीन वर्षात जिल्ह्यात दिवसाला एक कोरोना मृत्यू

खामगाव – बुलडाणा जिल्ह्यासह खामगाव शहरात कोरोनाचे संकट आणखी गंभीर झाले आहे.   खामगाव शहातील दोघांचा कोरोना मुळे मृत्यु झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधित व मृतकांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. अनलॉक नंतर नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. विदर्भातील अमरावती, अकोला नंतर बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. बुलडाणा, खामगाव हे तालुके हॉट्सपॉट बनले असून जिल्हाभरात  दररोज आठशे च्या वर रूग्ण आढळून येत आहेत. एकीकडे लसीकरणाने जोर पकडला असला तरी रोज येणारी रूग्ण संख्या चिंता वाढवणारी आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे आयसोलेशन वार्ड फुल्ल झाल्याची स्थिती आहे. सुरूवातील 100 – 200 च्या घरातील आकडा आता हजाराच्या वर पोहचला आहे. शनिवार दि.27 मार्च रोजी जिल्ह्यात आजपर्यंतचे सर्वाधिक तब्बल 1130 रूग्ण आढळून आलेत. तर खामगाव शहरातील दोन कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे. प्रशासनाने कठीण निर्बंध घालून दिले असले तरी त्याचं पालन काही लोक करताना दिसत नाहीत, त्यामुळेच दिवसेंदिवस संकट अधिक गडद होत चालले आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील कोरोनाचे संकट पाहता तात्काळ कठोर निर्बंध लावण्याची गरज निर्माण झाली आहे. तर जंबो हॉस्पिटल तात्काळ उभारण्याची गरज आहे.

खागावात कोरोनामुळे दोघांचा मृत्यु

शनिवारी खामगावात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यु झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे. येथील भोसले ज्वेलर्सचे संचालक अशोक भोसले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्याठिकाणी तपासणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मागील 5 दिवसापासून त्यांच्या उपचार सुरु होते. दरम्यान (ता.27) पहाटे उपचार सुरु असताना अशोक भोसले यांची प्राणज्योत मालवली. त्याचप्रमाणेेे पत्रकार विनोद पाठक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी तपासी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान प्रकृती अधिक खराब झाल्याने त्यांना 12 मार्च रोजी अकोला येथील शासकीय रुग्णालय हलविण्यात आले होते. दरम्यान काल रात्री 10.30 वाजता उपचार सुरु असताना पाठक यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले असा आप्त परिवार आहे. पत्रकार विनोद पाठक यांच्या अकाली निधनाने जिल्ह्याच्या पत्रकार वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

3 महिन्यात 97 पेक्षा जास्त कोरोना बाधितांचा मृत्यु

मागील वर्षभरात 31 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्ह्यात 151 रूग्ण कोरोनामुळे दगावले होते. जानेवारीच्या सुरूवातीला कोरोनाचे संकट कमी होत असल्याचे  दिसून येत होते. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून जानेवारी, फेब्रुवारी व मार्च अशा तीन महिन्यातच 27 मार्च पर्यंत तब्बल 97 च्यावर रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अधिक भयंकर असून नागरिकांनी नियमांचे पालन करून काळजी घेण्याची गरज आहे. ही आकडेेेवारी   पााहता  जिल्ह्यात दिवसाला एक कोरोना मृत्यू होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here