Home हॅलो बुलडाणा २० वर्षीय महिला लहान मुलासह बेपत्ता

२० वर्षीय महिला लहान मुलासह बेपत्ता

खाऊ आणण्यासाठी जाते सांगुन गेलेली 
मलकापूर(प्रतिनिधी):खाऊ घेऊन येते असे सांगुन लहान मुलासह बाहेर पडलेली विवाहीत महिला घरी परतली नसल्याने मलकापूर शहर पोलिस स्टेशनला हरविल्याची तक्रार करण्यात आली आहे.सचिन भावसिंग धामोने वय-२४ वर्ष रा.रोहीदास नगर,मलकापुर यांनी 07 फेब्रु  सकाळी ०७.३० वाजता फिर्याद दिली असुन त्याची बहीण नामे- सौ.संगिता भारत बामले वय-२० वर्ष रा. आझाद नगर,सुरत राज्य गुजरात ही ०५ महीण्यापासुन आई-वडीलांकडे रोहीदास नगर मलकापुर येथे दीड वर्षाच्या मुलासह राहत होती. दि 07 फेब्रु रोजी सायं.०७.३० वाच्या सुमारास मुलाला सोबत घेवून खाऊ आणण्याकरीता दुकानावर जात आहे असे सांगून निघून गेली आहे. त्यांनी शेजारी पाजारी विचारपुस केली असता मिळून आली नाही. तसेच त्याबाबत त्याचे नातेवाईक यांना विचारपुस करुन तिचा शोध घेतला असता. ती मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी बहीणीचा शोध व्हावा. करीता पोस्टे मलकापुर शहर येथे मिसींग क्र.०८/२०२१ दाखल केला.हरवीलेल्या महिलेचे वर्णन :- सौ.संगिता भारत बामले वय-२० वर्ष,रंग – सावळा , उंची – ५ फुट , बांधा- मजबुत , चेहरा- गोल ,केस- काळे लांब,पेहराव – अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात चप्पल,सोबत लहान मुलगा- अंकुश भारत बामले वय- दिड वर्ष,रंग – सावळा , चेहरा-गोल , केस-काळे, पेहराव – अंगात लाल रंगाची टी-शर्ट व निळया रंगाची जिन्स पॅन्ट,सदर वर्णनाची महिला व मुलगा कोणाला आढळुन आल्यास मलकापुर शहर पोलीस स्टेशनला- ०७२६२ २२२०१८ या व्रâमांकावर अथवा पोनि प्रल्हाद काटकर यांचेशी मो.९७६४३३०९०० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here