Home पर्यटन अंबाबरवात खामगावच्या पर्यटकांना वाघोबाचे दर्शन 

अंबाबरवात खामगावच्या पर्यटकांना वाघोबाचे दर्शन 

 

सातपुडय़ाच्या कुशीतील अंबाबरवा अभयारण्य बनले पारखी निसर्ग पर्यटकात आकर्षक

विठ्ठल निंबोळकार
संग्रामपूर, दि. २० (प्रतिनिधी)
……………..
अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारीसाठी निघालेल्या काही पर्यटकांना १९ मार्चला सायंकाळी चार वाजता पट्टेदार वाघाचे दर्शन झाले.
अंबाबरवा या अभयारण्याचा व्याघ्र प्रकल्पाच्या पट्ट्यात समावेश झाला आहे. या ठिकाणी पट्टेदार वाघांसह बिबट, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह विविध वन्यजीवांचे वास्तव्य आहे. या अभयारण्यात वन्यजीव विभागाने पर्यटनाची व्यवस्था केल्याने पर्यटनप्रेमींसाठी एक आनंदाची पर्वणी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, खामगाव येथून काही पर्यटक १९ मार्चला सायंकाळी चार वाजता जंगल सफारी करीत होते. त्यांना जंगलात एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघाचे जंगलातील काही क्षण त्यांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यातही कैद केले. वाघाचे रुबाबदार रुप पाहून अंगावर रोमांच उठल्याची प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली. हे पर्यटक खामगाव येथील होते. खामगाव लगतच सुटाळा बु ग्रामपंचायत सरपंच निलेश देशमुख हे परिवारासह अंबाबरवा गेले असता त्याना वाघोबाचे दर्शन झाले.

अभयारण्याचा दर्जा
शासनाने ९ एप्रिल १९९७ च्या आदेशान्वये अंबाबरवा वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. १२७.११० चौरस किलोमीटरचे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले हे क्षेत्र संरक्षित झाल्याने येथील समृद्ध जैवविविधता जपली गेली. बुलडाणा जिल्ह्य़ाच्या उत्तर पूर्वेला सातपुडय़ाच्या कुशीत विसावलेले अंबाबरवा अभयारण्य पारखी निसर्ग पर्यटकाने अभयारण्यात पाऊल टाकल्यानंतर त्याला मोहून टाकते आणि त्याला परत परत तिथे येण्यास भाग पाडते.

पर्यटन आणि तीर्थाटन

भाविकांच्या दृष्टीनेही अंबाबरवा अभयारण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. अभयारण्यात मांगेरी या ठिकाणी डाव्या बाजूला उंच असा दुर्गम डोंगर दिसतो. यालाच मांगरी महादेवाचा डोंगर असे नाव आहे. सातपुडय़ाच्या हिरव्यागार पर्वतरांगेमध्ये वसलेले आणि नावाप्रमाणे महाशिखरावर विराजमान झालेले महादेवाचे मंदिर हे या अभयारण्यातले आणखी एक आकर्षणाचे ठिकाण आहे. अभयारण्यात आणखी अनेक खोरे आणि दऱ्या असून प्रत्येकांची विशेषता वेगळी आहे. जळकाकुंड, पिंपलडोह खोरा, चिमानखोरा अशी ठिकाणं साहसी पर्यटकांना आकर्षित करतात.

बुलडाणा जिल्ह्य़ाच्या उत्तर पूर्वेला सातपुडय़ाच्या कुशीत विसावलेले अंबाबरवा अभयारण्य पाहण्यासाठी गेलो होतो. अभयारण्यात पाऊल टाकल्यानंतर हा परिसर मोहून वर्षा पर्यटन व अन्य मोसमात येथे जंगल सफारी करता येते. आम्हाला जंगल सफारी दरम्यान वाघ दिसला. तो अनुभव चित्तधरारक होता.
– निलेश देशमुख
सरपंच सुटाळा बु ग्रामपंचायत
खामगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here