Home Breaking News अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जा मत्र्यांच्या घराचे विज कनेक्शन कापणार – रविकांत तुपकर

अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जा मत्र्यांच्या घराचे विज कनेक्शन कापणार – रविकांत तुपकर

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा ; स्वाभिमानीचा रास्ता रोको

बुलडाणा : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे व सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे तात्काळ थांबवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर – औरंगाबाद महामार्गावर पेठ ता.चिखली जि.बुलडाणा) येथे रास्तारोको करण्यात आला. जर सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही तर आम्ही ऊर्जा मंत्री व मुख्यमंत्री यांच्या घरांचे वीज कनेक्शन कापू , असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला.. सकाळ पासून चाललेल्या रास्तारोको मुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्याने महामार्गावर अडीच तास वाहतूक खोळंबली होती…यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात होता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here