Home Breaking News जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4460 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू; आजवर 229 मृत्यू

जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4460 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू; आजवर 229 मृत्यू

*कोरोना अलर्ट : प्राप्त 5193 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 885 पॉझिटिव्ह*
• 433 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 6096 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 5193 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 885 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 435 व रॅपीड टेस्टमधील 450 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 655 तर रॅपिड टेस्टमधील 4538 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 5193 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व तालुका : 119, खामगांव शहर व तालुका : 129, शेगांव शहर व तालुका : 31, दे. राजा तालुका व शहर : 85, चिखली शहर व तालुका : 51, मेहकर शहर व तालुका : 10, मलकापूर शहर व तालुका : 124, नांदुरा शहर व तालुका : 85, लोणार शहर व तालुका : 26, मोताळा शहर व तालुका : 32, जळगांव जामोद शहर व तालुका : 87, सिं. राजा शहर व तालुका : 92 आणि संग्रामपूर शहर व तालुका : 14 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 885 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून 433 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 172451 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 23116 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23116 आहे.
आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 172451 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 27805 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 23116 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4460 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 229 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
********

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here