Home Breaking News पत्रकारावर हल्ला करणारे आरोपी मोकाट; पोलिसांनी कारवाई करावी

पत्रकारावर हल्ला करणारे आरोपी मोकाट; पोलिसांनी कारवाई करावी

मलकापूर- सायंदैनिक मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत भ्याड हल्ला करणाऱ्याना तातडीने अटक करीत पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत कार्यवाही व्हावी अशी मागणी आज १७ मार्च रोजी पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
१६ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सायंदैनिक मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत हे आपले वृत्तपत्राचे कार्यालय बंद करून समोरील रूपाली डेअरीकडे दुध आणण्याकरीता निघाले होते. दरम्यान माता महाकाली परिसरातील मोहन महादेव लटके हा दारूच्या नशेत आला व त्याने तुमच्या वृत्तपत्रात माझ्या वडिलांच्या चांगल्या बातम्या प्रकाशित करा कारण माझे वडील येत्या नगर पालिका निवडणुकीत उभे राहणार आहेत. त्यावर विरसिंह राजपूत यांनी त्यास म्हटले की, सद्या न.प. निवडणुकीला बराच कालावधी आहे. त्यामुळे आपण हा विषय पुढे बघू असे समजावून सागितले असता त्याने दारूच्या नशेत वाद घालीत सरळ अश्लील शिविगाळ सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्याने भ्रमणध्वनीद्वारे त्याच्या १० ते १५ साथीदारांना बोलवून घेत विरसिंह राजपूत यांच्यावर हल्ला केला. मद्यधुंद अवस्थेत गुडप्रवृत्तीमुळे हल्ला करीत आरोपींनी शांतता भंग करण्याचा व दहशत निर्माण करण्याचा प्रकार केला.
तरी या प्रकरणी आरोपी मोहन लटकेसह त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करीत पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून निवेदनाच्या प्रतिलिपी संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनावर रमेशभाऊ उमाळकर, हरीभाऊ गोसावी, हनुमान जगताप, गजानन ठोसर, अजय टप, अतुल होले, मनोज पाटील, राजेश इंगळे, नितीन पवार, प्रविण राजपूत, समाधान सुरवाडे, विजयकुमार वर्मा, गौरव खरे, संदीप सावजी, स्वप्नील आकोटकर, आबु बागवान, निखील चिम,  धिरज वैष्णव, अशोक रवणकार, नवील वाघ, गुलाबराव गावंडे, श्रावण पाटील, विलास खर्चे, सतीष दांडगे, श्रीकृष्ण तायडे यासह आदी पत्रकार बांधवांच्या सह्या आहेत.
दारूच्या नशेत वाद घालीत मोहन लटकेसह त्याच्या साथीदारांनी मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी विरसिंह राजपूत यांनी शहर पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरूध्द कलम २९४, ३२३, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना अद्यापपावेतो मात्र अटक करण्यात आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here