Home Breaking News आज 885 कोरोनाने बाधीत; खामगाव टॉपवर, खबरदारी हाच उपाय

आज 885 कोरोनाने बाधीत; खामगाव टॉपवर, खबरदारी हाच उपाय

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च 17 रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 885 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.विशेष म्हणजे एकट्या खामगाव तालुक्यात 129 रूग्ण आढळले आहे. त्या खालोखाल मलकापूर 124 बुलडाणा तालुक्यात 119 एवढे रुग्ण आहे..

असे आहे तालुकानिहाय रुग्ण

▪️बुलडाणा: 119 ▪️खामगाव: 129
▪️शेगाव : 31 ▪️दे. राजा : 85
▪️चिखली : 51▪️मेहकर : 10
▪️मलकापूर: 124▪️नांदुरा : 85
▪️लोणार : 26▪️मोताळा : 32
▪️सि. राजा : 92 ▪️जळगाव जा.: 87
▪️संग्रामपूर : 14

एकूण टेस्ट: 6096
पॉझिटिव्ह : 885
निगेटिव्ह : 5193

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे.ट्रेसिंग सुरू असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचा दर सुद्धा चांगला आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here