Home जागर ओम आणि शिव थोरहाते या जुळया भावंडांनी केली अशीही कमाल!

ओम आणि शिव थोरहाते या जुळया भावंडांनी केली अशीही कमाल!

हिवरा आश्रम :दरवर्षी उन्हाच्या दाहकतेने परिसरातील तहानलेल्या पशू पक्ष्यांची पाण्याअभावी होरपळ होते. अशा तहानेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांसाठी हिवरा आश्रम येथील ओम थोरहाते,शिव थोरहाते या जुळया भावंडांनी टाकाऊ शहाळया पासून दाणापाणी पात्र बनविले. त्‍यांचे पर्यावरण प्रेमीकडून कौतूक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सद्या उन्हाळयाच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याअभावी पक्षांची कमालीची घालमेल सुरू आहे. पर्यायाने निसर्गातील चिमण्या, कावळे, पोपट व इतर पक्षांची संख्या झपाटयाने कमी होत आहे.

उन्हाळयाच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर, झाडाला टांगून व सभोवताली जलपात्रे ठेवून पक्षांना जगविणे काळाची गरज आहे. या भावनेतून हिवरा आश्रम येथील ओम संतोष थोरहाते, शिव संतोष थोरहाते या जुळया भावंडांनी आपल्या पालकांकडे चिऊतार्इसाठी जलपात्र व पाणीदाणीची सोय करण्याचा हट्ट पकडला. संतोष थोरहाते व सौ.लक्ष्मी थोरहाते यांनी आपल्या पाल्याच्या पक्ष्यांसाठी जलपात्राच्या हट्टलाला  सकारात्मक प्रतिसाद देते टाकाऊ शहाळयापासून पक्ष्यांसाठी दाणापाणी पात्र बनविले. ओम  व शिव थोरहाते हे प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठाचे विद्यार्थी आहेत.

चिऊतार्इचे लहानमुलांना कमालीचे आकर्षण असते. अंगणात दाण टिपण्यासाठी आलेल्या चिऊतार्इचे दाणे टिपतांनाची मोहक मुद्रेने बच्चे कंपनीला कमालीचे वेड असते. सिमेंटच्या जगात व तंत्रज्ञानामुळे पक्षांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. चिऊ, काऊ  व लहानगे यांचे नाते निसर्गाशी वर्णन करणारे अनेक संदर्भ सर्वच साहित्य प्रकारात अतिशय तन्मयतेने कवीराजांनी वर्णन केले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगीकरण, वाढते जलप्रदुषण, झाडांची वारेमाप कटार्इ सुरू असल्यामुळे गर्द वनरार्इचा प्रकर्षाने अभाव दिसून येतो. म्हणून मानवाला पर्यावरण रक्षणासाठी मनापासून साद घालावी लागणार आहे. ओम, शिव थोरहाते यांचे चिऊतार्इसाठी केलेल्या जलपात्रावर पाणी पिण्यासाठी सकाळ, संध्याकाळ येणाऱ्या पक्ष्यांच्या किलमिटामुळे ओम व  शिव यांचा चेहरा उजळून जातो.

चिमुकल्यांच्या धडपडीचे कौतुक

ग्लोबल वार्मिंग व मोबार्इल टॉवरच्या रेडिएशनचा चिमण्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. सिमेंटच्या जगात झाडांचे अस्तित्व कमी होत आहे. चिमण्यांना निवाऱ्यासाठी झाडे कमी होत आहे. नदी, तलाव आटत असल्यामुळे त्यांच्यासाठी पाणीपात्राची सोय करणे गरजेचे आहे. ओम थोरहाते, शिव थोरहाते यांनी पक्ष्यांसाठी टाकाऊ शहाळयापासून बनविलेल्या दाणापाण्याची सोय केली. चिमुकल्यांच्या या धडपडीचे सद्या कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here