Home Breaking News आणखी 2 दगावले;आजपर्यंत 222 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

आणखी 2 दगावले;आजपर्यंत 222 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

*कोरोना अलर्ट : प्राप्त 2264 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 567 पॉझिटिव्ह*
514 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.16: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2831 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2264 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 567 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 359 व रॅपीड टेस्टमधील 208 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 701 तर रॅपिड टेस्टमधील 1563 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2264 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 71, बुलडाणा तालुका : करडी 4, सागवन 1, सुंदरखेड 4, दुधा 8, कुबेफळ 1, ढालसावंगी 1, धाड 6, वालसावंगी 1, कोलवड 1, उबाळखेड 1, चिखली शहर : 32, चिखली तालुका : वैरागड 1, खैरव 2, सातगांव भुसारी 1, शेलगांव जहा 1, दहीगांव 1, किन्होळा 1, मंगरूळ नवघरे 1, उंद्री 1, नागणगांव 1, खंडाळा 1, गांगलगांव 4, मोताळा शहर : 4, मोताळा तालुका : डिडोळा 1, तारापूर 3, निपाणा 2, आव्हा 1, शेलगांव बाजार 2, लोणार शहर : 3, लोणार तालुका : हिरडव 1, सुलतानपूर 8, पळसखेड 1, संग्रामपूर तालुका : वानखेड 5, मनार्डी 2, शेवगा 2, हिंगणा 11, बाभुळखेड 1, खामगांव शहर : 108, खामगांव तालुका : लाखनवाडा 2, सुटाळा 4, काक्ता 1, टेंभुर्णा 1, गोंधनपुर 1, आवार 1, पिंप्री गवळी 2, पिं. राजा 1, शिरसगांव दे 1, हिवरखेड 1, शेलोडी 14, शिर्ला नेमाने 1, पोरज 1, हिवरा बु 2 नांदुरा शहर : 23, नांदुरा तालुका : शेंबा 2, जवळा बाजार 1, वळती 1, पिंप्री अढाव 1, पातोंडा 1, निमगांव 1, टाकरखेड 2, खैरा 1, निमखेड 1, बरफगांव 1, मलकापूर शहर : 23 , मलकापूर तालुका : दाताळा 2,लोणवडी 1, दे. राजा शहर : 40, दे. राजा तालुका : सिनगांव जहा 5, डोढ्रा 2, चिंचोली बुरूकुल 1, सावंगी टेकाळे 1, गिरोली 1, पांग्री 1, जळगांव जामोद शहर : 8, जळगांव जामोद तालुका : बोराळा बु 5, बोराळा खु 4, कजेगांव 4, पळशी सुपो 7, सुनगांव 1, मेहकर शहर : 25, मेहकर तालुका : नायगांव दत्तापूर 4, सावंगी माळी 2, सारंगपूर 7, कनका 1, पांग्री काटे 1, मादनी 1, महागांव 1, अंजनी बु 1, कळमेश्वर 2, जानेफळ 2, चिंचोली बोरे 1, खळेगांव 2, डोणगांव 1, सिं. राजा शहर : 10, सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 1, आडगांव राजा 4, ताडेगांव 1, साखरखेर्डा 8, उमरद 2, दत्तापूर 1, शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : लासुरा 1, जलंब 1, पहुरजिरा 1, मूळ पत्ता असोला ता. रिसोड 1, फत्तेपूर जि जळगाव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 567 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सिद्धार्थ नगर, चिखली येथील 65 वर्षीय महिला व गोपाल नगर, खामगांव येथील 78 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 514 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 117, खामगांव : 69, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 7, आशिर्वाद हॉस्पीटल 4, सहयोग हॉस्पीटल 3, कोविड रूग्णालय 5, मुलींचे वसतीगृह 8, अपंग विद्यालय 13, दे. राजा : 37, मेहकर : 13, जळगांव जामोद : 29, सिं. राजा : 31, नांदुरा : 43, मलकापूर : 91, शेगांव : 31, मोताळा : 12, संग्रामपूर : 6, लोणार : 2.
तसेच आजपर्यंत 162856 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 22379 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 22379 आहे.
आज रोजी 3505 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 162856 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 26230 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 22379 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3629 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 222 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here