Home क्राईम महिलेवर अत्याचार करून व्हिडीओ बनविला, गुन्हा दाखल

महिलेवर अत्याचार करून व्हिडीओ बनविला, गुन्हा दाखल

खामगाव – ओळखीचा गैरफायदा घेवून महिलेवर एका युवकाने अत्याचार केला. तसेच अश्लिल व्हीडीओ तयार करून त्याव्दारे ब्लॅकमेल करून वारवार पैसे उकळले. हा धक्कादायक खामगाव शहरात उघडकीस आला आहे. याबाबत त्रस्त झालेल्या पीडितेने शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी सदर युवकाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ४२ वर्षीय पीडितेने पोस्टेला दिलेल्या तक्रारीत नमूद आहेकी, तिची फ्रिज फायनान्स घेण्यावरून अशोक शेषराव झगाळे (३०) रा. जुनाफैल याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेवून अशोकने सदर महिलेला शेगाव येथे लॉजवर नेले व चाकूचा धाक दाखवून बळजबरीने संभोग केला. तसेच कन्या शाळेच्या ग्राऊंडवर नेवूनही अत्याचार केला. या प्रकाराचा त्याने चोरून व्हीडीओ काढला व त्याव्दारे तो सदर महिलेला वारंवार पैशांची मागणी करीत होता.पीडित महिलेने आतापर्यंत अशोक इंगळेला १ लाख रूपये दिले असून तो आणखीन पैशाची मागणी करून हा व्हीडीओ व्हायरल करण्याची तसेच पतीला दाखविण्याची धमकी देत आहे. अशा आशायच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अशोक शेषरावब झंगाळे याच्या विरूद्ध ३७६(३), ३७६(२)(एन) ५०६ भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here