शेगाव : विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजबिल व वीज तोडणी च्या प्रश्नावर त्वरित निर्णय घेऊन राज्यातील घरगुती आणि शेतकर्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही अशे वक्तव केले होते. परंतु आदिवेशन संपताच घूम जाव करीत वीज तोडणी वरची स्तगीती उठचली त्या मूळ विधुत वितरण कंपनी ने मोठ्या प्रमाणात शेगाव शहर व ग्रामीण भागामध्ये सक्तीची वसुली वीज तोडणी सुरु केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने शेतकरी तसेच सर्वसामान्य जनता धस्तावले आहेत.अव्वा च्या सव्वा बिले नागरिकांना आलेले आहेत. चुकीचे रिडींगचा ही त्या मध्ये समावेश आहे. वीज बिला मध्ये सवलात मिळेल असे
वक्तव ऊर्जा मंत्री यांनी केले होते.वीज बिल माफ होईल या आशेने वीज ग्राहकांचे वीज बिल भरले नाही. वर्ष भर थांबून आता मात्र वीज वितरन कंपनीकडून वीज तोडणी जोरात चालू केली आहे. कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना नोटीस विना ही कार्यवाही सुरु आहे. विज बिल हे प्रमाणा पेक्षा जास्त आले आहेत. आगोदर वीज बिला मध्ये सुधारनां करावी. जनतेला विश्वासात घ्यावे नंतरच कार्यवाही करावी.केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी घरगुती वीज बिलांमध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे अशी मांगणी स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी निवदनां द्वारे केली असून. तरी सुद्धा वीज वितरण कंपनी वीज तोडणी थांबवत नसेल तर मात्र वीज वितरण कंपनीचे कनीक्शन तोडू असा इशारा स्वाभिनानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे कडून देण्यात आला आहे.