Home Breaking News खामगाव सर्वाधिक, आज इतके रुग्ण कोरोनाने बाधीत

खामगाव सर्वाधिक, आज इतके रुग्ण कोरोनाने बाधीत

जिल्ह्यामध्ये आज 567 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

बुलडाणा : जिल्ह्यामध्ये आज 567 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

15 मार्च काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 567 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे. दरम्यान 23 मार्च प्रयत्न लॉक डाऊन वाढविला आहे. खामगाव तालुका आज सर्वाधीक 147 रुग्ण आढळून आल्याने चिंतेचा विषय आहे.

 

असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

▪️बुलडाणा: 118 ▪️खामगाव: 147
▪️शेगाव : 05 ▪️दे. राजा : 53
▪️चिखली : 38▪️मेहकर : 52
▪️मलकापूर: 26▪️नांदुरा : 35
▪️लोणार : 12▪️मोताळा : 06
▪️सि. राजा : 25 ▪️जळगाव जा.: 31
▪️संग्रामपूर : 19

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here